hospital help 
उत्तर महाराष्ट्र

गुराखीची मृत्यूशी झुंज, पैशांअभावी थांबली शस्त्रक्रिया

चेतना चौधरी

धुळे: गायी, म्हशींना जंगलात चारून मजुरी करत कुटुंबाचा चरितार्थ करीत असताना पाच दिवसांपूर्वी बसने दिलेल्या धडकेत भगत पारधी (वय 36) हा तरुण गंभीर जखमी झाला. धुळ्यातील खासगी रुग्णालयात तो मृत्यूशी झुंज देत आहे. अजूनही त्यांच्यावर दोन शस्त्रक्रियांची गरज आहे. मात्र परिस्थिती हलाखीची असल्याने औषधोपचाराचा खर्च पेलणे शक्‍य नसल्याने भगतच्या पत्नीसह समाजबांधव आर्थिक मदत मागत दानशूरांकडे जात आहेत. समाजातील तरुणाच्या औषधोपचारासाठी जिल्ह्यातील पारधी समाजाने एकत्र येत नवा आदर्श घालून दिला.

मुळचे शेळावे (ता. पारोळा) येथील भगत पारधी हे गावातील गुरे, म्हशी चारून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पत्नी व चार मुले असा आनंदाचा संसार सुरू असताना मुलगा सुरजसह 5 नोव्हेंबरला ते सोनगीरकडे जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. मात्र रस्त्यातच सोनगीर फाट्यावर बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने दोघेही जखमी झाले. यात भगत यांच्या डोक्‍याला जबर मार लागल्याने मोठया प्रमाणात रक्तस्राव झाला. तर सुरजचा डावा पाय फ्रॅक्‍चर झाला.

सात ते आठ लाख खर्च
अपघातात भगत यांच्या डोक्‍याला गंभीर मार लागल्याने बऱ्याच प्रमाणात रक्तस्राव झाला आहे. त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाली असून अद्याप दोन शस्त्रक्रिया होणे बाकी आहे. त्यासाठी सात ते आठ लाख रुपये खर्च होण्याची शक्‍यता डॉक्‍टरांनी वर्तवली आहे. मात्र भगतची आर्थिक परिस्थिती पाहता दवाखान्याचा खर्च पेलणे शक्‍य नाही. कुटुंबातील एकुलता एक कमावता पुरुष दवाखान्यात असल्याने पैशांची आवकही बंद झाली. अशातच कुणीतरी मदतीचा हात पुढे करेल या प्रतीक्षेत भगतची पत्नी आणि लहान मुले दवाखान्याच्या बाहेर बसली आहेत.

पारधी महासंघाकडून लोकवर्गणी
आदिवासी पारधी समाजातील भगत हा अपघातात गंभीर जखमी असल्याने त्याच्या उपचारासाठी पारधी महासंघाकडून लोकवर्गणी जमविण्यात आली. मागासवर्गीय समाजातील प्रत्येकाने आपले कर्तव्य समजत आर्थिक कुवतीनुसार मदत केली. काल एकाच दिवसात भगतसाठी दहा हजार रुपये जमवत सामाजिक ऐक्‍याचा नवा आदर्श पारधी महासंघाने घालून दिला आहे.

आर्थिक मदतीसाठी आवाहन
गंभीर अवस्थेत असलेल्या भगतवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र अजूनही त्यांना सात ते आठ लाख रुपये उपचारासाठी खर्च येणार आहे. प्रतिकूल परिस्थितीतील तरुणाची मृत्यूशी चालणारी झुंज समाजातील दानशूरांनी मदत केली तर नक्‍कीच यशस्वी ठरेल. सामाजिक कार्यकर्ते, दानशूरांनी भगतला मदतीसाठी (9623538767, 9766745894) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Saralabai Premdas Pardhi  
Bank of Maharastra
branch- Parola, Jalgaon
a/ c 60308536648  
ifsc code  MAHB 0001813

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Khatal: गटार साफसफाईच्या दुर्घटनेतील दोन्ही कुटुंबांना मदत मिळवून देऊ: अमोल खताळ; कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन

Shubhanshu Shukla Return : आज अंतराळातून पृथ्वीवर परतणार शुभांशू शुक्ला; सोबत घेऊन येत आहेत 'हा' खजिना..

Weekly Horoscope 14 to 20 July 2025: जुलैचा तिसरा आठवडा, कोणत्या राशींना मिळणार यश अन् समृद्धी? वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Marathi News Live Updates : जयंत पाटलांनी राजीनामा दिला नाहीय : सुप्रिया सुळे

Crop Insurance Scheme: अशी आहे नवीन पीकविमा योजना; सहभागी होण्यासाठी ३१ जुलै अंतिम मुदत

SCROLL FOR NEXT