Sub-Divisional Police Officer Datta Pawar, Police Inspector Shivaji Budhwant and staff along with the motorcycles seized by Shahada Police from Attal motorcycle thief. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : सराईत दुचाकीचोर जेरबंद; कारवाईत 5 दुचाकी जप्त

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : शहादा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दुधखेडा (ता. शहादा) येथील एका सराईत मोटारसायकल चोरास शहरातील डोंगरगाव रस्त्यावर पेट्रोलिंग करताना जेरबंद केले.

त्याच्याकडून एक लाख ५२ हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.(bike thieves jailed 5 bikes seized in action dhule crime news)

जिल्हा पोलिस प्रमुख पी. आर. पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दुधखेडा (ता. शहादा) येथील रहिवासी गणेश पांडू पवार मोटारसायकल चोरी करत असून, त्याच्या शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत शहाद्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना कळविले होते.

त्यानुसार पोलिस निरीक्षक बुधवंत यांनी पोलिस उपनिरीक्षक छगन चव्हाण, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रदीपसिंग राजपूत, पोलिस नाईक योगेश थोरात, घनश्याम सूर्यवंशी, किरण पावरा, पोलिस कॉन्स्टेबल दिनकर चव्हाण, भरत उगले, अजय चौधरी यांना असलोद दूरक्षेत्र व शहादा शहरात गुन्हेगार वॉच ड्यूटी व पेट्रोलिंग करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने सोमवारी (ता. ३०) पथक शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना दुधखेडा येथील संबंधित गणेश पांडू पवार मिळून आला. त्यास पोलिस ठाण्यात आणून विचारपूस केली असता त्याने मोटारसायकल चोरीची कबुली दिली. त्याच्या ताब्यातील वेगवेगळ्या कंपन्यांच्या एक लाख ५२ हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, शहाद्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nipah Virus Alert : सावधान! पश्चिम बंगालमध्ये आढळले ‘निपाह’ विषाणूचे रूग्ण; केंद्र सरकारकडून हालचालींना वेग

Pune News : सिंहगड रोड परिसरातील नागरिकांचा एल्गार; बिनविरोध निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले!

Bhogi Horoscope : भोगीनंतर 'या' 5 राशींचे भाग्य बदलणार; अचानक मिळतील पैसे, रखडलेली कामे पूर्ण होणार अन् ऑफिसमधून मिळेल खुशखबर

PMC Abhay Yojana : पुणेकरांनो घाई करा! अभय योजनेचे शेवटचे ७२ तास शिल्लक; ७५ टक्के सवलत गमावू नका!

Vande Bharat Sleeper Train: प्रतीक्षा संपली! देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ शनिवारपासून धावणार

SCROLL FOR NEXT