helmate is compulsory for all in dhule esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना कार्यालयांमध्ये प्रवेशबंदी; उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार दुचाकीस्वाराने व त्याच्या मागील सीटवरून प्रवास करणाऱ्या व्यक्तीने हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक आहे.

असे असतानाही अनेक मोटारसायकलचालक हेल्मेटचा वापर करीत नसल्याचे आढळले आहे.

दैनंदिन घडणाऱ्या रस्ते अपघातात सर्वाधिक अपघात दुचाकीचे आहेत. हेल्मेट न घातल्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या मोठी असून, दर वर्षी राज्यात सुमारे सात हजार दुचाकीस्वार रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. (Bikers without helmets banned from entering offices Decision of Sub Regional Transport Office to enforce traffic rules by two wheelers Dhule News )

दुचाकीस्वारांनी वाहतुकीचे नियम पाळावेत व त्यांना हेल्मेटचे महत्त्व पटावे यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नंदुरबार यांच्याद्वारे जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खासगी कार्यालये, शैक्षणिक संस्था, बँका, मॉल्स, हॉटेल्स इत्यादींना हेल्मेटसक्तीबाबत नोटीस बजावण्यात येत असून, हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना त्यांच्या संस्थेत प्रवेश न देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

कलम १९४ ड अन्वये विनाहेल्मेट मोटारसायकल चालविणे किंवा चालविण्यास संमती देणे अशा दोघांवरही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली असून, त्यांना दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.

एक हजार रुपये दंड व तीन महिने ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याची तरतूद आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

"जिल्ह्यातील सर्व नागरिकांना तसेच सर्व कार्यालये, संस्था यांना विनंती करण्यात येते, की त्यांनी आपल्या कार्यालयात/आस्थापनेच्या आवारात विनाहेल्मेट दुचाकीवर प्रवेश करणाऱ्यास प्रतिबंध करावा. स्वतःच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा."

किरण बिडकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नंदुरबार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT