BJP office bearers listen to PM Mann Ki Baat sakal
उत्तर महाराष्ट्र

तळोदा : भाजप पदाधिकाऱ्यांनी ऐकली पंतप्रधानांची ‘मन की बात’

तळोद्यात जनसंपर्क कार्यालयात थेट प्रक्षेपण

सकाळ वृत्तसेवा

तळोदा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या माध्यमातून ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे देशातील विविध समस्या, उपक्रम, अन्य सामाजिक विषयांवर जनतेशी थेट संवाद साधतात. या कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून थेट प्रसारण केले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे नुकतेच तळोद्यात आमदार राजेश पाडवींसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे रसग्रहण केले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार तथा विभागीय संघटनमंत्री रवी अनासपुरे यांच्या सूचनेनुसार, तसेच जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा शहर मंडलाध्यक्ष योगेश चौधरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यात आले.

आमदार राजेश पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, शहर मंडलाध्यक्ष योगेश चौधरी, जिल्हा चिटणीस तथा नगसेवक हेमलाल मगरे, महिला मोर्चा उपाध्यक्ष शानूबाई वळवी, जिल्हा चिटणीस नीलाबेन मेहता, विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, शहर महिला मोर्चा अध्यक्षा भारती कलाल, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष दीपक चौधरी, शिरीष माळी, बळिराम पाडवी, तालुका आदिवासी आघाडीचे दारासिंग वसावे, उपाध्यक्ष दरबारसिंग पाडवी, शहर उपाध्यक्ष राजू गाडे, उपाध्यक्ष हरीश साळुंखे, अनुसूचित जाती शहराध्यक्ष जीवन अहिरे, शहर सरचिटणीस ईश्वर पोटे, तालुका उपाध्यक्ष रसिलाबेन देसाई, अमी तुरखिया, सुनील परदेशी, अल्पसंख्याक आघाडीचे अकबर पिंजारी, नगरसेवक रामानंद ठाकरे, नगरसेवक सुरेश पाडवी, जालंधर भोई, नगरसेवक योगेश पाडवी, अमानोद्दिन शेख, दीपक पाडवी, कोशाध्यक्ष अरविंद प्रधान, माजी कोशाध्यक्ष सुभाष शिंदे, तळवेचे माजी सरपंच कृष्णा पाडवी, आभाबेन वाणी, सोशल मीडियाप्रमुख अनिल परदेशी, कौशलकुमार सवाई, वीरेंद्र भाट आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षक आघाडी संयोजक प्रमोद चौधरी, मनोज परदेशी, नितीन गरुड, गणेश चौधरी, राकेश चौधरी यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, या वर्षातील हा पहिलाच कार्यक्रम असल्याने जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या सूचनेनुसार तळोदा मंडळातील प्रत्येक बूथवर ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamaltai Gavai : संघाच्या कार्यक्रमाला जाणं टाळलं, पण पत्राद्वारे दिल्या शुभेच्छा; कमलताई गवई यांनी नेमकं काय म्हटलं?

FASTag नसल्यास १०० रुपयांऐवजी UPIने १२५ तर रोख २०० रुपये; टोलबाबत नवे नियम

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील सर्व खटले घेतले मागे

माेठी बातमी! 'पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण भोवणार'; नेमके काेणत्या शेतकऱ्यांचे सरकारी लाभ बंद होण्याची शक्यता..

Vidarbha Tigers: सह्याद्रीत घुमणार विदर्भातील वाघांची डरकाळी! स्थानांतरणास हिरवा कंदील, वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT