Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : भाजप ‘सिरीयस’; शिवसेना आक्रमक!

सकाळ वृत्तसेवा

धुळे : बहुमतामुळे महापालिकेत गेली चार वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या भाजपला यंदा वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमुळे विरोधकांनी घेरण्यास सुरवात केली आहे.

महापालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या विविध विकास कामांमधील अनियमितता, गैरप्रकार, दिशाहीन प्रशासकीय कारभारासह चाललेली बेबंदशाही आणि निष्कृष्ट कामांप्रश्‍नी ठेकेदारांना दिले जाणारे अभय आदी मुद्दे हाताळत शिवसेनेचा ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

त्यामुळे भाजप ‘सिरीयस’ होत असून शहरातील ‘डॅमेज कंट्रोल’ रोखण्याचे स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांसह नेत्यांपुढे मोठ आव्हान असेल.

भाजपच्या शहर- जिल्हा शाखेची नुकतीच एक बैठक झाली. पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. त्यात महापालिकेतील भाजपच्या चार वर्षांतील सत्ता कालावधीत शासनाकडून आलेला निधी आणि होणारी विविध कामे याविषयी प्रमुख पदाधिकारी ‘सिरीयस’ दिसून आले. (BJP on Serious mode Shiv Sena Aggressive Damage control is a serious question before leaders including rulers of municipal corporation Dhule News)

तंबी देण्याची वेळ

केंद्र व राज्य शासनाकडून धुळे शहरासाठी कोट्यवधींचा निधी मिळवून आणला आहे. तसेच राज्यात सत्तासंघार्षनंतर शिंदे- फडणवीस सरकार आल्यावर रस्ते कामांसाठी सुमारे शंभर कोटींचा निधी मिळाला आहे. परंतु, एमआयएमचे शहरातील आमदार फारुक शाह हे त्यांनी मिळवून आणलेल्या निधीतून निरनिराळ्या विकासकामांचे उद्‌घाटन करताना दिसतात.

त्याप्रमाणे चार वर्षांत शहराला मिळालेल्या कोट्यवधींच्या निधीतून होणाऱ्या आपल्या विकास कामांची उद्‌घाटने, कार्यक्रम का दिसून येत नाहीत, असा प्रश्‍न भाजपच्या स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठकीत उपस्थित केला.

याप्रश्‍नी पक्षासह स्थानिक प्रमुख पदाधिकारी, नेते ‘सिरीयस’ असून नगरसेवकांनी चार वर्षांत केलेल्या कामांची यादी सादर करावी, तरच त्यांना या वर्षभरात मिळणाऱ्या निधीतून कामे दिली जातील, अशी तंबी देण्याची वेळ बैठकीत आली.

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

गटबाजीमुळे शिवसेना पोखरली

एकीकडे भाजपकडून महापालिकेद्वारे झालेले चार वर्षांतील प्रयत्न व शहर विकासाबाबत मंथन होत असताना शिवसेनेचा ठाकरे गट मात्र, आक्रमक झाला आहे. महापालिकेचे नियंत्रण उरले नसल्याने ठिकठिकाणी रस्त्यांची निष्कृष्ट कामे, संरक्षक भिंत कोसळणे, स्वच्छतेचा बोजवारा, पाणीपुरवठ्याचे कोलमडलेले नियोजन, आरोग्याचा प्रश्‍न, खड्ड्यांचा गंभीर प्रश्‍न यासह विविध मुद्दे हाताळण्यास शिवसेनेच्या ठाकरे गटाने सुरवात केली आहे.

पूर्वी शिवसेनेचा महापौर, मनपात प्राबल्य असतानाही गटबाजीमुळे शिवसेना पोखरली गेली. परिणामी, गेल्या निवडणुकीत शिवसेनेचा एकच नगरसेवक महापालिकेत निवडून आला. त्यामुळे शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्‍न स्थानिक पदाधिकाऱ्यांना सतावत आहे. महापालिकेत पुन्हा प्राबल्य निर्माण होण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाने आता सत्ताधारी भाजपला घेरण्यास सुरवात केली आहे.

आमदार फारुक शाह हे देखील आगामी आमदारकीची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन महापालिकेसह भाजपला लक्ष्य करीत आहेत. डिसेंबर २०२३ ला महापालिकेची निवडणूक असल्याने आता विरोधी पक्ष भाजपविरोधात सक्रिय होताना दिसतील. विविध आंदोलने, निवेदनांचे सत्र सुरू होईल.

‘डॅमेज कंट्रोल’ चा प्रश्‍न

असे असताना शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून महापालिकेच्या माध्यमातून शहरात होणाऱ्या निष्कृष्ट कामांचा पर्दाफाश करण्याचे

सत्र सुरू झाले आहे. हा गंभीर प्रश्‍न आहे. प्रसारमाध्यमांनीही वेळोवेळी मनपातील सत्ताधारी भाजपसह स्थानिक नेत्यांना शहरातील निष्कृष्ट कामे, कचरा संकलनातील भ्रष्टाचार यासह विविध अनियमित कारभाराबाबत सजग करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याकडे डोळसपणे पाहिले असते तर भाजपपुढे आज प्रतिमा, प्रतिष्ठा टिकविण्याचा, ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रश्‍न उभा ठाकला नसता.

नादुरूस्त रस्ते व ठिकठिकाणी खड्डे, अनियमित व आठवड्यानंतर पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य, दुतर्फा वाढती अतिक्रमणे व निमुळते होत चाललेले रस्ते, पार्किंग, एलईडी पथदीप आदींसंदर्भात धुळेकरांमध्ये महापालिकेविषयी तीव्र नाराजी आहे.

मुबलक पाणीसाठा असतानाही एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन का होऊ शकत नाही? यावर बोलण्याऐवजी भाजपचे नेते, अधिकारी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे नाव पुढे करतात. इतर प्रश्‍नांवर नेते, महापालिका तोंडातून ‘ब्र’ काढण्यास तयार नाही. त्यामुळेच अनेक नागरिक आता विरोधकांकडे प्रश्‍न मांडून वाचा फोडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याला भाजपचे पदाधिकारी, नेते कसे सामोरे जातात याकडे सर्वांचे लक्ष असे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT