BJP Win Panchayat Samitee Election in Dhule  
उत्तर महाराष्ट्र

पराभवाचे भाजपने काढले उट्टे

सकाळ वृत्तसेवा

धुळेः भाजपच्या या निवडणुकीतील यशासाठी माजी आमदार द. वा. पाटील गटाची भूमिका निर्णायक ठरली आहे. या गटानेच खऱ्या अर्थाने तालुक्यादत भाजपचे वर्चस्व निर्माण केले आहे. विधानसभेचा बदला पंचायत समितीतील सत्ता हिसकावून घेतल्याचे बोलले जात आहे. धुळे पंचायत समितीत जवाहर गटाला आव्हान देण्याची आणि सत्तेपासून वंचित ठेवण्याची जादू माजी आमदार (कै.) द. वा. पाटील यांनी बऱ्याच वेळा करून दाखविली आहे. हा गट भाजपत दाखल झाल्यापासून भाजपची मोठी ताकद वाढली आहे. त्या ताकदीतूनच भाजपची सत्ता आकाराला आली अन्‌ पुन्हा एकदा माजी आमदार पाटील गटाचे वर्चस्व निर्माण झाले आहे.

धुळे तालुक्याात पंचायत समिती अस्तित्वात आल्यापासून अनभिषिक्तपणे कॉंग्रेसची सत्ता राहत आली आहे. या सत्तेला राष्ट्रवादीचीही साथ मिळत गेली. माजी आमदार (कै.) द. वा. पाटील गट आणि माजी मंत्री रोहिदास पाटील गटातच आलटून पालटून सत्ता राहायची. जिल्हा परिषदेत तरी एकदा भाजपच्या मदतीने शिवसेनेची सत्ता स्थापन झाली होती. मात्र, पंचायत समितीत तसे झालेले नव्हते. आता भाजपने एकहाती सत्ता मिळवीत झेंडा फडकावत विधानसभा निवडणुकीत पराभवाचे उट्टे काढले आहे.
- जगन्नाथ पाटील, कापडणे


विजयाचे शिल्पकार
धुळे पंचायत समितीवर वर्षानुवर्षे कॉंग्रेस राष्ट्रवादीचीच संगनमताने सत्ता चालत होती. प्रथमच भाजपने हा बालेकिल्ला एकतर्फी नेस्तनाबूत केला आहे. यासाठी खासदार सुभाष भामरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राम भदाणे, ज्येष्ठ नेते प्रा. अरविंद जाधव, कृषी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बापू खलाणे, किशोर सिंघवी, तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, शंकर खलाणे आदींच्या रणनितीतून हा विजय साकारला आहे. मात्र, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राम भदाणे यांनी यासाठी तालुक्यानतील प्रत्येक उमेदवाराच्या विजयासाठी जातीने प्रयत्न केल्याचे जाणकारांच्या नजरेतून सुटलेले नाही.

विधानसभेचा बदला
धुळे ग्रामीण विधानसभा निवडणूक भाजपच्या ज्ञानज्योती भदाणे यांना कॉंग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी पराभूत केले. ही पराभवाची सल पाटील कुटुंबासह भाजपत खदखदत होती. पंचायत समितीवर एकहाती भाजपची सत्ता बसवून त्यांनी या पराभवाचे पूर्णपणे उट्टे काढून घेतले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि माजी जिल्हाध्यक्ष अनुक्रमे किरण शिंदे आणि किरण पाटील यांना पराभूत करण्यासाठीही माजी आमदार पाटील कुटुंबाने विशेष प्रयत्न केले अन्‌ त्यात ते सक्सेूस ठरलेत. एकंदरीत विधानसभेतील राजकारणाचा धडा घेत भाजपने तालुक्या्सह जिल्ह्यात इतिहास निर्माण केला आहे. आता जिल्ह्यात भाजपची, तालुक्या‍त भाजपची सत्ता पण, आमदार कॉंग्रेसचा आहे. राज्यात सत्ता महाविकास आघाडीची आहे. अशा स्थितीत विकासकामांसाठी स्पर्धा वाढणार आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शेतकऱ्यांच्या DBT वर दसऱ्यापर्यंत मदत जमा करणार'; अजित पवार यांचे आश्‍वासन, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचीही दिली ग्वाही

Pune Traffic App : वाहनचालकांवर मोबाईलवरूनच कारवाई, ‘पुणे ट्रॅफिक’ ॲपला प्रतिसाद; आतापर्यंत ४२ हजार तक्रारी

West Indies Tour India 2025 : वेस्ट इंडिज संघ ७ वर्षांनी भारतात येणार; दिग्गज खेळाडूच्या मुलाला संधी, १५ सदस्यीय संघाची घोषणा

Latest Marathi News Updates : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगावात आज अंत्यसंस्कार

Shivram Bhoje Death : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगाव येथे आज होणार अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT