16 लाख दे... नाही तर घरात पाणी द्यायलाही कोणी नसेल...

blackmail on call.png
blackmail on call.png

नाशिक : 16 लाख रुपये रोख न दिल्यास कुटुंबातील कोणालाही घरात पाणी द्यायला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली मिळाल्यानंतर शिक्षक पगार यांच्यासह कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले. धमकी देणारा हा कॉल करणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचाच नातेवाईक होता. विकास पगार यांना त्रास देण्याच्या उद्देशाने नातेवाईक शरद शिंदे त्यांच्याकडे खंडणीची मागणी करीत होता. विकास पगार यांच्याकडून 16 लाख मिळविण्यासाठी शरद त्यांना शिवीगाळ व ठार करण्याची धमकीही देत होता. 

असा घडला प्रकार...
9 डिसेंबर 2019 ला रॉयल हब इमारतीजवळील श्रीराम डेअरीजवळ हा प्रकार घडला होता. मालेगाव येथील कॅम्प भागातील शिक्षक विकास पगार (वय 49) विवेकानंद कॉलनी येथील रहिवासी असून हे पेशाने शिक्षक आहे. 16 लाख रुपये रोख न दिल्यास कुटुंबातील कोणालाही घरात पाणी द्यायला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली होती. शिवीगाळ व ठार करण्याची धमकीही देण्यात आली. धमकी देणारा हा कॉल करणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचाच नातेवाईक होता. विकास पगार यांना त्रास देण्याच्या उद्देशाने शरद शिंदे त्यांच्याकडे खंडणीची मागणी करीत होता.

शरद शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल...

16 लाख रुपये रोख, शिवीगाळ व ठार करण्याची धमकी देणाऱ्या शरद शिंदे (रा. द्याने) याच्याविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल झाला आहे. धमकी देणारा शरद हा शिक्षक विकास पगार यांचा नातेवाईक आहे. त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने तो त्यांच्याकडे खंडणीची मागणी करीत होता. 9 डिसेंबरला शरदने मोबाईलवरून 16 लाख रुपये रोख न दिल्यास कुटुंबातील कोणालाही घरात पाणी द्यायला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी मिळाल्याने विकास यांनी न्यायालयात तक्रार दिली होती.  न्यायालयाच्या आदेशावरून छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.  हेही वाचा >  लाचखोरीचे बदलले स्वरूप, महसूल दोन कदम आगे...पहा कसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com