vijay bava esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Bribe Crime : 7 हजारांची लाच घेताना मंडळ अधिकारी ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

Dhule Bribe Crime : कौटुंबिक शेतजमीन वाटणीच्या कामासंदर्भात तक्रारदाराकडून सात हजारांची लाच स्वीकारताना निजामपूर येथील मंडळ अधिकारी विजय वामन बावा यास बुधवारी (ता. २१) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.

ही लाच भामेर (ता. साक्री) येथील तक्रारदाराच्या राहत्या घरीच स्वीकारताना विजय बावा यास अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (Board officer bava detained while accepting bribe of 7 thousand dhule bribe crime news)

भामेर येथील गट नंबर ४३ व ४४ या शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीच्या कामासाठी निजामपूर मंडळ अधिकारी विजय बाबा यांनी तक्रारदाराकडे १८ हजारांच्या लाचेची मागणी केली होती.

यात तडजोडीअंती १५ हजार रुपये सांगून त्यापैकी आधी आठ हजार रुपये घेतले होते. उर्वरित सात हजार रुपयांची पंचासमक्ष मागणी करून भामेर येथील तक्रारदाराच्या राहत्या घरी स्वीकारताना मंडळ अधिकारी विजय बाबा यास पथकाने पकडले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे धुळ्याचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण यांच्यासह पथकातील राजन कदम, शरद काटके, भूषण खलाणेकर, संतोष पावरा, भूषण शेटे, रामदास बारेला,

प्रशांत बागूल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, गायत्री पाटील, रोहिणी पवार, वनश्री बोरसे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने केली. कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परीक्षेत्र पोलिस अधीक्षिका शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार आदींचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident एकमेकांचे जिवलग मित्र… मिळून थार घेतली; ताम्हिणी घाटात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची हृदयद्रावक करुणकथा

ऊसतोड मशीनमध्ये सापडून महिलेचा दुर्दैवी अंत; संक्रट्टी कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, हा भयंकर अपघात पाहून...

Pune News : काय सांगता? पुण्यात नगरसेवक पदासाठी चक्क १ कोटीची बोली...नेमका कुठं घडला प्रकार?

Tamhini Ghat Accident : प्रगतीची भरारी राहिली अर्धवट; अपघातानंतर कोंढवे धावडे, कोपरे परिसरात शोककळा

Latest Marathi News Live Update : तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी आज मालेगाव बंद

SCROLL FOR NEXT