live
live 
उत्तर महाराष्ट्र

पुस्तक प्रदर्शन मांडून घडला अनोखा विवाह सोहळा

सकाळवृत्तसेवा

सिन्नर (नाशिक)- पारंपारीक पध्दतींना फाटा देत घोरवड (ता. सिन्नर) येथील प्रयागतिर्थावर अनोखा विवाहसोहळा पार पडला. लग्न मंडपात क्रांतीकारक, महापुरुष आणि आदिवासी बांधवांचे अधिकार या विषयांवरील पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे ब्रिगेड अर्थात आदीम सामाजिक लोकचळवळीचे कार्यकर्ते संदीप गवारी यांनी स्वतःचे लग्न घोरवड (म्हसाळवाडी) येथील भारती काळु म्हसाळ यांच्यासोबत अनोख्या पध्दतीने केले.

विवाह सोहळा सुरु होण्याआधी वधु-वरांनी धरती मातेची पूजा केली. दुंदा घोयरत, भाऊ गवारी यांनी मांडव मंत्र म्हणत फुलांच्या वर्षावात संदीप आणि भारती विवाहबध्द झाले. महामित्र दत्ता वायचळे यांनी नवदांपत्याला भारतीय राज्यघटनेची प्रत भेट देऊन या अनोख्या विवाह सोहळ्याचे स्वागत केले. क्रांतीकारकांच्या प्रतिमांना अभिवादन करुन आदिवासी मांडव मंत्राच्या जयघोषात हा विवाह सोहळा रंगला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT