Boy killed after hitting bike dhule accident news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Accident News : दुचाकीला धडकल्याने मुलगा ठार; भरधाव कंटेनरचे चाक निखळले

सकाळ वृत्तसेवा

Dhule Accident News : शहरातील देवपूर परिसरात सातपुडा हायस्कूलसमोर उड्डाणपुलावर सोमवारी (ता. १०) विचित्र अपघात झाला. भरधाव कंटेनरचे अचानक चाक निखळून दुभाजक ओलांडून दुचाकीला धडकले.

त्यात दुचाकीवरील मुलगा ठार झाला. तसेच आई-वडील गंभीर जखमी झाले. शादबा एजाजमुसा बागवान असे मृत मुलाचे नाव आहे. (Boy killed after hitting bike dhule accident news)

या घटनेत एजाज मुसा बागवान (वय ५३) व रिजावानबी ऐजाजमुसा बागवान (रा. घर क्र. १७ डी, बंधेवास सोसायटी, मिलीतनगरजवळ, देवपूर) जखमी झाले. फळविक्रेते एजाज बागवान पत्नी रिजावानबी व मुलगा शादबा यांच्यासह सोमवारी रात्री सव्वाआठनंतर दुचाकीने जात होते.

यादरम्यान देवपूरमधील नगावबारी शिवारातील सातपुडा हायस्कूलसमोरील उड्डाणपुलावर दुसऱ्या बाजूने भरधाव ‍कंटेनर (एचआर ३९, ई ७१७४)चे एक चाक निखळले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ते दुभाजक ओलांडून थेट बागवान यांच्या दुचाकीला धडकून अपघात झाला. त्यामुळे दुचाकीवरील तिघे खाली पडून जबर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले.

उपचार सुरू असताना शादबा बागवान याचा मृत्यू झाला. इतर दोघांवर उपचार सुरू आहेत. याबाबत जखमी एजाजमुसा बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी (ता. ११) कंटेनरचालकावर पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SAW Final: शफाली वर्मा-दीप्ती शर्माची अर्धशतकं, ऋचाची वादळी खेळी; World Cup जिंकण्यासाठी भारताचे द. आफ्रिकेसमोर मोठं लक्ष्य

वाशिमध्ये खळबळ! २ किलो अंमली पदार्थ अन् लाखो रुपयांच्या बनावट नोटा जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

Crime: 'तुझ्यामुळे माझी बहीण गेली...'! मामाचे शब्द ऐकताच भाचा संतापला; रागात खेळच संपवला, वादाचं कारण काय?

Lonar Lake : अहो आर्श्चयम! लोणार सरोवरात आढळले चक्क मासे, दुर्मिळ जैवविविधता धोक्यात...

Pune: चेंजिंग रूमपासून ते मोबाईल चार्जिंगपर्यंत सुविधा... पुण्यात स्मार्ट सार्वजनिक शौचालये बांधणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT