Bribe Case News
Bribe Case News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Bribe News : गुलाब रुतला लाचेच्या काट्यात

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : ग्रामपंचायतीच्या दप्तरात जन्माची नोंद करण्यासाठी एक हजार ४०० रुपयांची लाच स्वीकारताना जामन्यापाडा (ता.शिरपूर) येथील ग्रामसेवक गुलाब रामदास चौधरी याला धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

आज (ता.५) दुपारी जामन्यापाडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात ही कारवाई झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर चौधरी याला ताब्यात घेताना त्याने प्रतिकार केला.

त्यामुळे बलप्रयोग करून त्याला अटक करणे भाग पडले. (bribe crime in manpada gram panchayat bribery department get strict action against criminal dhule crime news)

या प्रकरणातील तक्रारदार जामन्यापाडा गावातील रहिवासी आहे. त्याच्या आत्याचा जन्म १९६८ मध्ये झाला असून तिचे वडील अशिक्षित असल्यामुळे त्यावेळी जन्माची नोंद केली नव्हती. जन्माची नोंद करून मिळावी, यासाठी तक्रारदाराने येथील न्यायालयात अर्ज दिला होता.

२०२२ मध्ये न्यायालयाने महिलेच्या जन्माची दप्तरी नोंद करण्यासाठी आदेश जारी केले. आदेशाची प्रत जोडून १६ मेस तक्रारदाराने अर्ज दिला. त्यावर ग्रामसेवक चौधरी याने लेट फी म्हणून एक हजार ४०० रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.

हा सरळ लाच मागण्याचा प्रकार असल्याचे दिसून आल्याने तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तक्रारीची पडताळणी करून त्यात तथ्य असल्याचे आढळल्याने पथकाने सोमवारी दुपारी जामन्यापाडा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला. तक्रारदाराकडून एक हजार ४०० रुपये स्वीकारल्यानंतर झडप टाकून पथकाने गुलाब चौधरीला ताब्यात घेतले.

त्यावेळी त्याने पथकाच्या तावडीतून सुटण्यासाठी जोर लावला. त्यामुळे बलप्रयोग करून त्याला अटक करण्यात आली. ग्रामसेवक चौधरी सोनगीर (ता.धुळे) येथील रहिवासी असल्याचे कळते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक क्षेत्राच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, वाचक उपअधीक्षक नरेंद्र पवार, धुळे विभागाचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण, हवालदार राजन कदम, शरद काटके, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागूल, रोहिणी पवार, वनश्री बोरसे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT