Police officers Hrishikesh Reddy, Hemant Patil, Anand Kokre and search team present during inspection in Malegaon Road area in case of murder.
Police officers Hrishikesh Reddy, Hemant Patil, Anand Kokre and search team present during inspection in Malegaon Road area in case of murder. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : उत्तर प्रदेशच्या हमालाचा धुळे शहरामध्ये निर्घृण खून!

सकाळ वृत्तसेवा

धुळे : उत्तर प्रदेशातील हमालाचा शहरात खून झाला आहे. त्याचा मृतदेह सोमवारी (ता. २) सकाळी शहरातील श्रीराम पेट्रोलपंपाजवळील जलकुंभाच्या मागील बाजूस आढळला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, सहाय्यक पोलिस अधीक्षक ह्रषीकेश रेड्डी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व शहराचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलिस शोधपथकाचे प्रल्हाद वाघ, नीलेश पोतदार, कुंदन खरात, गुणवंत पाटील, मच्छिंद्र पाटील, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी उपस्थित होते. (brutal murder of Uttar Pradesh labor in Dhule city Dhule Crime News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

मृतदेहाजवळ आधारकार्ड आढळले. त्यावर विजय कुमार (वय ३५, आत्मज, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) असा उल्लेख आहे. त्याच्या डोक्यावर डाव्या बाजूस, पाठीवर मोठी जखम असून, अंगावर टी-शर्ट, तर उर्वरित नग्नावस्थेत मृतदेह आढळला. विजय हमालीचे काम करीत असल्याची माहिती इतर हमालांनी पोलिसांना दिली.

दोन महिन्यांपासून तो येथे कामासाठी आला होता. भंगार बाजारात तो हमाली करीत होता. परिसरात नशेखोर असून, त्यातील कुणीतरी विजयच्या खिशातून पैस काढून अथवा अनैतिक संबंधातून त्याचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी न्यायवैद्यक चाचणी पथकाला बोलवून तेथील नमुने गोळा करण्यात आले.

तसेच त्याचे कपडे व खिशातील वस्तूही परीक्षणासाठी ताब्यात घेण्यात आल्या. विजयकुमारच्या खुनाचे कारण अस्पष्ट असून, त्याचा मृतदेह विच्छेनदासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT