burglary 4 houses in night and looted lakhs dhule crime news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : चोरट्यांनीच ‘त्याला’ पाजले पाणी; घाबरू नका, चाव्या द्या.. सांगत 4 घरे फोडली

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : निमडाळे (ता. धुळे) येथे चोरट्यांनी एकाच रात्रीतून चार घरे फोडून रोकडसह लाखोंचा ऐवज लंपास केला. एका घरात तर सशस्त्र चोरट्यांनीच घाबरलेल्या व्यक्तीला माठातून पाणी आणून पाजले.

तुम्ही घाबरू नका, फक्त चाव्या द्या.. म्हणत कपाटातून पाच लाखांची रोकड काढून पोबारा केला. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण आहे. (burglary 4 houses in night and looted lakhs dhule crime news)

निमडाळे येथील विठ्ठल भाऊराव साळुंखे परिवारासह बाहेरगावी होते. त्यामुळे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी कडीकोयंडा तोडत सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली. नंतर चोरट्यांनी भटू लकडू पाटील यांच्याकडे घरफोडी केली. चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.

रवींद्र भिका पाटील यांचेही घर चोरट्यांनी फोडले. पुढे त्यांनी काशीनाथ विठ्ठल सूर्यवंशी यांच्या घराकडे मोर्चा वळविला.

सूर्यवंशी परिवारासह झोपलेले असताना चोरट्यांनी घरात शिरकाव केला. त्या वेळी सूर्यवंशी व त्यांच्या पत्नीला जाग आली. घरात सशस्त्र चोरटे पाहून सूर्यवंशी दांपत्य घाबरले.

चोरट्यांनीच सूर्यवंशी यांना माठातून पाणी आणून पाजले. ‘तुम्ही घाबरू नका, आम्हाला फक्त चाव्या द्या...’ असे सांगत चावी घेतल्यावर सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून कपाटातून पाच लाख २० हजारांची रोकड लंपास केली व चोरटे मागच्या दाराने पळाले. गावात एकाच रात्री चार ठिकाणी झालेल्या धाडसी चोरीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या पथकाने तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT