Cupboard broken by thieves. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : शहाद्यात एकाच रात्री 3 ठिकाणी घरफोड्या; घरमालक आल्यावर होणार गुन्ह्याची नोंद

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : येथील शिरूड चौफुलीनजीक असलेल्या शांतिवन वसाहतीत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप व कडीकोयंडा तोडून घरफोडी केली.

ही बाब मंगळवारी (ता. ३) सकाळी शेजारी राहणाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिस व घरमालक यांना माहिती दिली. घरफोडीत किती ऐवज गेला याबाबत घरमालक आल्यानंतरच समजणार आहे.(Burglary at 3 places in Shahada in one night nandurbar crime news)

येथील कृष्णकांत पवार परिवारासह शनिवारपासून सुरत येथे गेले असता चोरट्यांनी पुढच्या बाजूचा कडीकोयंडा तोडत घरात प्रवेश केला. घरातील व कपाटातील सामान अस्ताव्यस्त करत चोरट्यांनी किती मुद्देमाल लंपास केला हे समजू शकले नाही.

शिवाय याच परिसरातील रहिवासी कुलदीप पवार यांचेही घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी पाच पाच हजार रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने असा ऐवज नेल्याचे समजते. तिसरे रहिवासी संजय वाघ नंदुरबार येथे बदली झाल्याने त्यांच्या बंद घराची खिडकी तोडून आत प्रवेश करून चोरट्यांनी ऐवज लंपास केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कैलास जगताप यांची घरासमोरील उभी केलेली मोटारसायकलदेखील चोरट्यांनी चोरून नेली. शांतिवन वसाहतीत चोरट्यांनी तीन ते चार ठिकाणी घरफोड्या केल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे या चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाला असलेले कुलूप तोडण्यासाठी चक्क कट्यारचा उपयोग केला असल्याचा अंदाज लावला जात आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत घरमालक आले नसल्याने अद्याप गुन्हा दाखल नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT