senior citizen esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : वृद्ध प्रवासी दांपत्याशी वाहकाची अरेरावी; शिरपूर आगारप्रमुखांकडे तक्रार

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : बसमध्ये चढणाऱ्या वृद्ध दांपत्याशी अरेरावी करून त्यांना धक्का देऊन उतरवून दिल्याची तक्रार येथील आगारप्रमुखांकडे करण्यात आली. स्थानिक जिल्हा परिषद सदस्यांनी विनंती करूनही वाहकाने उर्मटपणा केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

शिरपूर-शहादा रस्त्यावरील भटाणे (ता. शिरपूर) येथील बसस्थानकाजवळ ही घटना घडली. (Bus conductor misbehave with elderly passenger couple dhule news)

मंगळवारी (ता. १७) सकाळी अकराला तेथे बस (एमएच ४०, ९०८८) पोचली. शालेय विद्यार्थी बसमध्ये चढत असताना संबंधित वृद्ध दांपत्यही रांगेत होते. मात्र वाहकाने बससेवा केवळ विद्यार्थिनींसाठी असल्याचे सांगून तुम्ही खाली उतरा, असे सांगितले. मात्र दांपत्याने आपल्याला आवश्यक कामासाठी जायचे असल्याचे सांगून उतरण्यास नकार दिला.

त्या वेळी वाहकाने अरेरावी करीत त्यांना धक्का देऊन खाली उतरविले. बसस्थानकावर उपस्थित जिल्हा परिषद सदस्य भीमराव ईशी, ज्ञानेश्वर पाटील व अन्य प्रवाशांनी हे दृश्य पाहिल्यानंतर मध्यस्थी करून दांपत्याला बसू द्या, अशी विनंती केली. त्यावर वाहकाने ही बस येथून पुढे जाणार नाही, तुम्ही कुठेही तक्रार करा पण मी यांना बसविणार नाही, असे उत्तर दिले.

पाटील यांनी वाहकाकडे तक्रार पुस्तकासह वाहकाचे नाव व बिल्ला नंबर द्या, अशी मागणी केली. त्यावर वाहकाने माझ्याकडे तक्रार पुस्तक नाही व बिल्ला नंबरही नाही, तुम्ही कुठेही तक्रार करा, असे सांगितले.

ईशी जिल्हा परिषद सदस्य असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर त्याने हुज्जत घालणे कायम ठेवले. त्यानंतर ज्ञानेश्वर पाटील यांनी शिरपूर आगारात जाऊन तक्रार दिली. शासनाने ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्धांना सवलती दिल्या आहेत. प्रत्यक्षात त्यांचा अवमानच होत असल्याचे दिसून येत असून, संबंधित चालकाची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank of Baroda: 'बँक ऑफ बडोदा'चा डेटा कसा 'लीक' झाला? ग्राहकांना धोका आहे का? बँकेने दिलं अधिकृत स्पष्टीकरण

Virar Timber Smuggling: विरारमध्ये भाजीपाल्याच्या टेम्पोआडून खैर लाकडाची तस्करी उधळली; वन विभागाची पहाटे धाडसी कारवाई, मुद्देमाल जप्त

Kelghar Ghat Landslide : चालक अजरुद्दीनच्या प्रसंगावधानामुळे वाचला जीव! केळघर घाटात जेसीबीवरच मोठी दरड कोसळली; महाबळेश्वर-सातारा मार्ग पूर्णपणे ठप्प

Bhima River Farmers: भिमा नदीत पाणी सोडूनही वीज नाही; संतप्त नदीकाठच्या शेतकऱ्यांची ‘आठ तास वीज नसेल तर पाणीही नको’ अशी सोशल मीडियातून हाक

Ganeshotsav Special: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांना मध्य रेल्वेची मोठी भेट; सीएसएमटी, एलटीटी, पुणे व दिवाहून तब्बल २४६ गणपती विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT