Bus driver honoured
Bus driver honoured esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : विनाअपघात सेवेबद्दल बसचालकांचा सन्मान!

सकाळ वृत्तसेवा

धुळे : राज्य परिवहन महामंडळात कार्यरत असताना सलग २५ व त्यापेक्षा अधिक वर्षे विनाअपघात उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल महामंडळातर्फे आठ चालकांचा (Bus Drivers) विभाग नियंत्रक विनय गिते यांच्या हस्ते सपत्नीक सन्मान करण्यात आला. सन्मानित चालकांना रोख बक्षीसही देण्यात आले. (bus drivers honored by State Transport Corporation for excellent service for 25 years more without accident dhule news)

राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकांनी विनाअपघात सुरक्षित बस चालवावी, प्रवाशांची सुरक्षा अबाधित ठेवून त्यांचा विश्वास दृढ करावा असा दंडक असतो. जे चालक या नियमांचे पालन करतील त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार विनाअपघात सेवा देणाऱ्या चालकांची माहिती संकलित करण्यात आली.

त्यानुसार धुळे विभागातील आठ चालक या निकषात पुढे आले. यात चालक सुदाम मराठे, अशोक शिंदे, भास्कर सूर्यवंशी, पंडित चौधरी, प्रकाश पाटील, शिवाजीराव पाटील, साहेबराव पवार, गोकुळ बोरसे यांचा समावेश आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

या आठही चालकांचा विभाग नियंत्रक गिते यांच्या हस्ते सपत्नीक सन्मान करण्यात आला. २५ वर्षे विनाअपघात सेवा दिलेल्या चालकांना २५ हजार रुपये रोख व सन्मानपत्र, २५ वर्षे विनाअपघात सेवेचा बिल्ला, स्मृतिचिन्ह, चालकाच्या पत्नीस साडी देण्यात आली. या कार्यक्रमाला महामंडळाचे येथील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Latest Marathi News Live Update : उद्या जर बिभव स्वतः आले नाहीत तर...स्वाती मालीवाल प्रकरणात महिला आयोग आक्रमक!

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT