Gram Panchayat Election esakal
उत्तर महाराष्ट्र

Gram Panchayat Bypoll Election : जिल्ह्यात 47 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक; 61 रिक्त जागांसाठी लढत

सकाळ वृत्तसेवा

Dhule Gram Panchayat By Election : राजीनामा, निधन, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या जागांच्या, तसेच थेट सरपंचाच्या रिक्त जागांच्या(Dhule News) पोटनिवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला.

यात नामनिर्देशन पत्रासोबत जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले आहे. (By elections of 47 gram panchayats for 61 vacancies dhule news)

जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायतींच्या ६१ सदस्य, तर दोन थेट सरपंच पदांचा निवडणुकीत समावेश आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून निकालपर्यंत आचारसंहिता लागू राहील. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना करता येणार नाही, असे उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील (प्रशासन) यांनी सांगितले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

निवडणुकीचा कार्यक्रम असा : तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे- मंगळवार (ता. १८), नामनिर्देशन पत्रे मागविणे व सादर करणे- २५ एप्रिल ते २ मे, सकाळी ११ ते दुपारी ३ (२९, ३० व १ ला सुटी वगळून), छाननी- ३ मे सकाळीपासून, माघारी- ८ मे दुपारी ३ पर्यंत. चिन्हांसह वैध उमेदवारांची यादी प्रसिद्धी- ८ मे दुपारी तीननंतर, मतदान- १८ मे सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत. मतमोजणी व निकाल- १९ मे. निवडणूक निकाल अधिसूचना प्रसिद्धी- २४ मे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Kagal : हसन मुश्रीफांच्या मनातलं आलं ओठावर, समरजित घाटगेंसोबत मनोमिलन करणाऱ्या अदृश्य शक्तीचं नाव केलं उघड; मंडलिकांवरही म्हणाले...

Credit Card Offer: लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड ऑफर! कमी क्रेडिट स्कोअर असला तरीही चालेल! काय आहे ही नवी ऑफर?

Latest Marathi News Live Update : कृषिमंत्री दत्तामामा भरणे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर

आजारी पत्नीवर जादूटोणा करण्याचा प्रकार उघड! 'शेतात चाललं होतं भयानक कांड'; संगमनेर तालुक्यातील धक्कादायक घटना समोर..

मैत्री असावी तर अशी! बेस्ट फ्रेंड अमृतासाठी प्राजक्ता माळीने पाठवलं 'खास' गिफ्ट

SCROLL FOR NEXT