crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : अभियंत्यांकडील घरफोडीत दागदागिन्यांसह रोकड लंपास

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : देवपूरमधील जीटीपी कॉलनीमधील जिल्हा परिषद अभियंत्यांच्या घरून चोरट्यांनी लाखोंचे दागिने व रोकड नेली. या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

अभियंता प्रदीप अशोक मराठे हे उदयभान पाटील यांच्या घरात भाडेतत्त्वावर राहतात. (Cash stolen with jewelry in house burglary from Engineers dhule crime news )

ते दोन दिवसांपासून बाहेरगावी गेले होते. रात्री त्यांचे कुटुंबीय घरात झोपलेले असताना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी संरक्षण भिंतीवरून उडी मारत घराची मागची खिडकी तोडून प्रवेश केला.

नंतर कपाट फोडून त्यातील सोन्याची दहा ग्रॅम वजनाची मंगलपोत, सात ग्रॅमचे कानातले, सहा ग्रॅमची अंगठी व अंदाजे १७ हजार रुपयांची रोकड असा ऐवज नेला. शुक्रवारी सकाळी कुटुंबीयांना जाग आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले.

अभियंता मराठे यांनी ही माहिती देवपूर पोलिसांना कळविली. नंतर पोलिस निरीक्षक सतीश घोटेकर, डॉग स्कॉडचे अधिकारी विनोद खरात, धनंजय मोरे, हवालदार मिलिंद सोनवणे, पंकज चव्हाण, प्रकाश भावसार, प्रशांत चौधरी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT