Cow Transport Pick Up esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : गोवंश वाहतूक करणारा Pick up वडणेजवळ जप्त

सकाळ वृत्तसेवा

सोनगीर : वडणे (ता. धुळे) गावाजवळील सरवड ते लामकानी मार्गावर येथील पोलिसांच्या गस्तीपथकाने कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची वाहतूक करणाऱ्या पिक-अप वाहनासह साडेतीन लाखांचा ऐवज जप्त केला.

ही घटना शुक्रवारी (ता. १३) पहाटे तीनच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (Cattle transporter Pick up seized near Wadne Dhule News)

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

येथील गस्तीवरील पोलिसांना समोरून वेगाने पिक-अप (जीजे ०६, एजी ४६१९) येताना दिसले. पोलिसांनी वाहनचालकास थांबण्याचा इशारा दिला.

मात्र चालकाने न थांबता वाहन भरधाव पळविले. पोलिसांनी पाठलाग केला असता काही अंतरावर चालकाने वाहन सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. वाहनाची तपासणी केली असता लहान-मोठे नऊ गोवंश दाटीवाटीने कोंबलेली आढळले.

ते कत्तलीच्या उद्देशाने वाहून नेले जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी पोलिसांत अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून, ५८ हजार रुपयांची जनावरे व तीन लाखांचे वाहन असा तीन लाख ५८ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश फड, पोलिस नाईक ईश्वर सोनवणे, सूरज सावळे, नितीन जाधव यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT