Jal Jeevan Mission
Jal Jeevan Mission esakal
उत्तर महाराष्ट्र

Jal Jeevan Mission : विलंब लावणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई; ‘सीईओ’ शुभम गुप्ता यांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

Jal Jeevan Mission : केंद्रीय महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे संथगतीने सुरू आहेत. प्रलंबित कामे फेब्रुवारीअखेर पूर्ण करावी, अन्यथा संबंधित कंत्राटदारांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे ‘सीईओ’ शुभम गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिला.

तथापि, उपस्थित ठेकेदारांनी पाणीपुरवठा योजनेचे काम मुदतीत पूर्ण करण्याची हमी जिल्हा परिषद प्रशासनाला दिली. (CEO Shubham Gupta statement action against delaying contractor Jal Jeevan mission dhule news)

जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात ४४८ कामांना मान्यता देण्यात आली आहे. शंभरावर कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे मुदतीत पूर्ण व्हावीत यासाठी योजनांची कामे करणाऱ्या ठेकेदारांची बैठक सीईओ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता जयश्री सार्वे, उपअभियंता संजय पढ्यार, हरिश्चंद्र पवार, जास्वंदी देवरे, रवींद्र देसले तसेच मक्तेदार व प्रकल्प सल्लागार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

योजनेत खोळंबा नको

श्री. गुप्ता म्हणाले, की जलजीवन मिशन हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या योजनेंतर्गत मंजूर कामे मुदतीत होणे अपेक्षित आहे. मात्र, असे असतानाही जिल्ह्यातील अनेक योजनांची कामे संथगतीने सुरू आहेत.

वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही त्यामध्ये अपेक्षित प्रगती झालेली दिसत नाही. कंत्राटदारांच्या दुर्लक्षामुळे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा खोळंबा होत आहे. त्यामुळे ठेकेदारांनी पाणीपुरवठा योजनांच्या कामात दिरंगाई करू नये.

प्रलंबित योजनांचे काम कुठल्याही परिस्थितीत फेब्रुवारीअखेर पूर्ण करावे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवरून कुठलीही अडचण उद्‍भवणार नाही. त्यानंतरही योजनांचे काम मुदतीत पूर्ण न झाल्यास संबंधित कंत्राटदांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा श्री. गुप्ता यांनी दिला.

सीईओंची नाराजी

या पुढील काळात मी योजनेच्या कामांच्या ठिकाणी भेटी देऊन पाहणी करणार आहे. कामाची प्रगती समाधानकारक न दिसल्यास कारवाई होईल. त्यामुळे मक्तेदारांनी हा विषय गांभीर्याने घेऊन कामात प्रगती करावी, काम मुदतीत पूर्ण करावे, अशी सूचना श्री. गुप्ता यांनी दिली.

त्यांनी धुळ्यासह साक्री, शिंदखेडा, शिरपूर अशा चारही तालुक्यांतील पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा गावनिहाय आढावा घेतला. तसेच ठेकेदारांच्या अडचणी जाणून घेतल्या. अनेक योजनांचे काम संथगतीने सुरू असल्याचे आढावाप्रसंगी निदर्शनास आले. त्यामुळे सीईओ गुप्ता यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: बंगालमध्ये वाद पेटला, TMC-ISF समर्थकांमध्ये हाणामारी, भाजपचा आरोप- पराभवाच्या भीतीने हिंसाचार

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT