Dhule Zilla Parishad esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule ZP News : केंद्रप्रमुखपदाच्या किमान पात्रतेत बदल ; सेवाज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारे होणार निवड

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आणि पदोन्नतीद्वारे केंद्रप्रमुखपदाच्या निवडीसाठीच्या व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रतेमध्ये सुधारणा केली आहे.

त्यानुसार मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील पदवी आणि जिल्हा परिषद शाळेत प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर सहा वर्षे अखंडित नियमित सेवा (Change in minimum qualification for post of Head of Centre dhule news)

तसेच पदोन्नतीने निवडीसाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर सहा वर्षे अखंडित नियमित सेवा पूर्ण केलेल्या उमेदवारांतून सेवाज्येष्ठता आणि गुणवत्तेच्या आधारे निवड केली जाईल, असे प्रशासनाने सांगितले.

शाळांमध्ये केंद्रप्रमुखांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आणि पदोन्नतीद्वारे केंद्रप्रमुख निवडीचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार पात्रता निश्चित करून प्रक्रिया सुरू केली.

मात्र, केंद्रप्रमुखपदाच्या पात्रतेबाबत आक्षेप घेऊन न्यायालयात याचिका दाखल होऊ लागल्या. त्यात प्रामुख्याने मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी पदवीला किमान ५० टक्के गुण अनिवार्य, किमान ५० वर्षे वयाची अट रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती.

या पार्श्वभूमीवर केंद्रप्रमुखपदाच्या पात्रतेतील सुधारणांबाबतचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला.

शासन निर्णयानुसार डिसेंबर २०२२ च्या शासन निर्णयातील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी पदवीला किमान ५० टक्के गुण, कमाल वयोमर्यादा ५० वर्षे, शिक्षणसेवक कालावधी वगळून जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान तीन वर्षे नियमित अखंड सेवा पूर्ण केलेल्या उमेदवारांतून सेवाज्येष्ठता आणि गुणवत्तेच्या आधारे पदोन्नतीने नेमणूक या तरतुदी वगळण्याचा निर्णय घेण्यात आला, तर उर्वरित तरतुदी लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

केंद्रप्रमुख हे पद जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील असल्याने सेवाप्रवेश नियमांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याची कार्यवाही ग्रामविकास विभागाने करावी, असे स्पष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT