The vessel near Panjra Chowpatty is dirty with thorn grass vegetation.
The vessel near Panjra Chowpatty is dirty with thorn grass vegetation. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : पावसाळापूर्व पांझरेच्या पात्राची स्वच्छता आवश्यक! अतिक्रमणे, काठावरील व्यावसायिकांमुळे नदी प्रदूषित

जगन्नाथ पाटील

Dhule : धुळे जिल्ह्यासाठी पांझरा नदी जीवनवाहिनी आहे. तिच्यावरील धरणे आणि प्रकल्प वरदान ठरले आहेत. मात्र पांझरा, शेंदवड, भवानी उगमापासून ते मुडावदजवळील तापी पांझरा संगमापर्यंत अतिक्रमणासह बऱ्याच ठिकाणी पात्र घाणीने माखल्याने अस्वच्छ झाले आहे.

नदीचे पात्र स्वच्छ करून सौंदर्य वाढविणे गरजेचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी सजगपणे पाहण्याची अपेक्षावजा मागणी वारंवार होत आहे. पावसाळ्यापूर्वी स्वच्छता होणे गरजेचे असल्याचे चर्चिले जात आहे. (Cleaning of cage before monsoon necessary River polluted due to encroachments traders on banks Dhule news)

पांझरा नदीचा उगम शेंदवड, भवानीपासून झाला आहे. नदीचा संगम मुडावद येथे तापी नदीत होतो. पांझरा उगमापासून ते संगमापर्यंत अतिक्रमणाच्या विळख्यात जखडली आहे. तिचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

उगमापासूनचे पहिले शहर पिंपळनेरपासून ते बेटावदपर्यंत सांडपाणी, मलमूत्र, घनकचरा मटण, मासे विक्रेते व इतर बाबींमुळे या नदीचे पात्र दूषित झाले आहे. नदीचा प्रत्येक गावाजवळील भाग अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे.

धुळे शहराजवळील नकाणेपासून ते वरखेडी कुंडाणेपर्यंत नदीचे पात्र अस्वच्छतेने माखलेले आहे. बरेचसे शहरी नागरिकही अस्वच्छता वाढविण्यासाठी विविध प्रकारे हातभार लावत असतात. पात्र काटेरी वनस्पतींनी वेढलेले आहे.

शहरातील नाले स्वच्छ केले जातात. पण पात्राकडे ढुंकूनही बघितले जात नाही. पात्र स्वच्छ झाल्याने पुराच्या पाण्याला अडसर निर्माण होत नाही.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पांझरा बचावासाठी लोकचळवळ

पिंपळनेर येथील पांझरा नदीकाठ बचाव समिती २०१५ पासून कार्यरत आहे. नदी बारमाही होण्यासाठी आणि सौंदर्य वाढविण्यासाठी समितीप्रमुख मोतीलाल पोतदार, सदस्य योगेश्वर देशपांडे, रामकृष्ण एखंडे, हेमराज दशपुते, भटू निकम, मोहन देवरे, रामदास नहिरे,

चंद्रकांत सोनार, कमलेश दशपुते, प्रा. राम पेटारे, प्रा. संजय खोडके, चंद्रकांत वाघ व दिलीप भोळे यांनी मोठा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. पांझरा बचाव समितीत प्रत्येकाने सहभागी होऊन लोकचळवळ होणे गरजेचे आहे. तसे झाल्यास खऱ्या‍या अर्थाने पांझरा वरदान ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT