Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : रात्री दहानंतर धुळे ‘बंद’ करा ; महापौर प्रतिभा चौधरी

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरात शांतता अबाधित राहण्यासाठी रोज रात्री दहानंतर सर्व व्यवसाय, आस्थापने बंद करावीत, अशी अपेक्षा महापौर प्रतिभा चौधरी यांनी पत्राद्वारे जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांच्याकडे व्यक्त केली आहे.

महापौर चौधरी यांनी म्हटले आहे, की शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक बारकुंड यांनी काही ठोस पावले उचलावीत. शहरातील काही अनुचित घटनांमुळे वातावरण दूषित झाले आहे. (Closed dhule after 10 pm Mayor Pratibha Chaudhary Expectations from District Superintendent of Police Dhule News)

दोन समुदायातील दरी वाढत असून अनेक व्यक्ती कायदा हातात घेण्याची भाषा करीत आहेत. त्यामुळे शहराची शांतता भंग होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी शहरातील व्यावसायिक आस्थापना, दुकाने रात्री दहानंतर बंद व्हावेत.

शहरातील संवेदनशील भागात कोबिंग ऑपरेशन राबवावे. रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, सीसीटीव्हीचे डीव्हीआर नियमित तपासावे, ड्रोन कॅमेराद्वारे संपूर्ण शहरावर लक्ष ठेवावे, तसेच फेसबुक, व्हॉटसॲप ग्रुपवर सायबर विभागातर्फे लक्ष ठेवावे, पोलिस कुमक वाढवावी, शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, शहरातील नागरिक वेठीस धरले जाऊ नये यासाठी व्यक्त केलेल्या अपेक्षांची पूर्ती व्हावी, असे महापौरांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT