Cold has been increasing in city for three to four days dhule winter update news Sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Winter Update : किमान तापमान 8.6 अंशांवर; 5 दिवस ढगाळ वातावरण

सकाळ वृत्तसेवा

Dhule Winter Update : शहरात तीन ते चार दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. रात्रीप्रमाणे दिवसाही गारठा जाणवत आहे. शहराचे किमान तापमान ८.६ अंशांवर पोचले आहे.

यंदाच्या हिवाळ्यातील तापमानाचा हा निच्चांकी आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या गार वाऱ्यांमुळे तापमानात घट झाली आहे.(Cold has been increasing in city for three to four days dhule winter update news)

शहरात बुधवारी (ता. २०) दिवसभर गार वारे वाहत होते. त्यामुळे किमान तापमानात दोन अंशांची घट झाली. मंगळवारी किमान तापमान ८.६ व कमाल २६ अंश असल्याची नोंद कृषी महाविद्यालयाच्या वेधशाळेत झाली. बदलत्या वातावरणामुळे सांधेदुखीसह सर्दी, ताप, खोकल्याच्या रूग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक पुरते बेजार झाले आहेत.

शहरात डिसेंबरच्या सुरवातीला किमान तापमान २० अंशांच्या जवळपास होते. नंतर ते कमी होऊन तीन दिवसांपासून दहा अंशांवर स्थिरावले होते. तसेच कमाल तापमान २९ अंश होते. ते आता २६ अंशांवर आले आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे बहुतांश भागात किमान तापमानात घसरण झाली आहे.

त्यामुळे कडाक्याची थंडी जाणवत आहे. आगामी पाच दिवस ढगाळ ते अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. साधारणपणे आठवडाभर वातावरण असेच असेल. किमान तापमान दहा अंशांखाली राहण्याची शक्यता आहे. तसेच पुढील काही दिवस गार वारे वाहतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

रुग्णांच्या संख्येत वाढ

शहरात पहाटे धुके, सकाळी थोडेसे ऊन, अधूनमधून आभाळात ढग, सायंकाळनंतर गारवा अशा वातावरणातील बदलांमुळे आजारांचा तापही वाढला आहे. लहान मुलांसह इतरांनाही सर्दी, खोकला, ताप, सांधेदुखी तसेच त्वचाविकारांशी संबंधित तक्रारी वाढत्या आहेत.

कोरडा खोकला, सर्दी यासह विविध वयोगटात सांधेदुखीच्या तक्रारी दिसून येत आहेत. थंडीची सुरवात झाली की हा त्रास वाढताना दिसतो. खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहे.

डॉक्टरांचा सल्ला

आठवडाभरापेक्षा अधिक काळ सर्दी, खोकला राहिला तर वैद्यकीय उपचार सुरू करायला हवेत, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. काही जण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थेट औषधे घेतात. परस्पर औषधे घेऊ नयेत. काही वेळा खोकला नियंत्रणात येत नाही, उलट तो वाढतो. त्यामुळे थंडीमध्ये होणाऱ्या या आजारांकडे दुर्लक्ष करू नये. हवेच्या खालच्या थरामध्ये स्थिर झालेल्या प्रदूषणामुळे डोळ्यांची जळजळ होण्यासह नाक व घसा खवखवतो.

या वातावरणामध्ये ताप टाळण्यासाठी दरवर्षी लसीकरण करावे. लहान मुलांमध्येही लसीकरण चुकवू नये. ‘एसी’चा वापर टाळावा, उघड्यावरचे अन्नपदार्थ टाळावे, प्रतिजैविकांचे सेवन वैद्यकीय सल्ल्याशिवाय करू नका, गरम पाणी प्यावे तसेच ताजे अन्न खावे, असा सल्लाही शहरातील डॉक्टरांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT