dhule district collector abhinav goyal
dhule district collector abhinav goyal esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : गोवर्गीय प्राण्यांचे बाजार भरविण्यास परवानगी : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : गोवंशीय पशुधनास लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गोवर्गीय प्राण्यांचे बाजार भरविण्यास तसेच जिल्ह्यांतर्गत गुरांची वाहतूक करण्यासाठी पुढील अटी-शर्तीनुसार मान्यता देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली. (Collector Abhinav Goyal allowed to hold cattle market dhule news)

धुळे जिल्ह्यात लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील गोजातीय प्रजातीची सर्व गुरे यांची ने-आण करण्यास, प्राण्यांचे बाजार, प्राण्यांच्या शर्यती, प्राण्यांच्या जत्रा, प्राण्यांची प्रदर्शने आयोजित करण्यास मनाई करण्यात आली होती.

महाराष्ट्र शासनाच्या २९ नोव्हेंबर २०२२ च्या अधिसूचनेनुसार संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील लम्पी चर्मरोगाचा आढावा घेतल्यानंतर नियंत्रित क्षेत्रात कोणताही प्राणी बाजार भरविणे आणि प्राण्यांच्या शर्यती लावण्यास परवानगी देऊ शकतात, असे नमूद आहे.

सद्यःस्थितीत जिल्ह्यात लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. याकरिता अटी-शर्तीस अधीन राहून मान्यता देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी गोयल यांनी म्हटले अहे.

अशा आहेत अटी-शर्ती

गोवर्गीय पशुधनाचे किमान लम्पी प्रतिबंधक लसीकरण २८ दिवसांअगोदर झालेले असावे. लम्पी रोगाने बाधित अथवा संशयित बाधित पशुधन बाजार आवारात व वाहतुकीस आणता कामा नये. पशुबाजार व आवारात कीटक, जंतू, डास, माश्या प्रतिबंधक द्रावणाची वेळोवेळी फवारणी करणे आवश्यक राहील.

सर्व पशुधनास शक्यतो टॅगिंग (कानातील ओळख बिल्ले असावेत व त्यांच्या खरेदी-विक्री पावतीवर उल्लेख असावा) प्राण्यांच्या रोगांचे प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियम २००९ मधील इतर तरतुदींचे काटेकोरपणे पालन केले जावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधींचे ठरले! अखेर वायनाडचा 'हात' सोडला

युएसएला मिळालं बक्षीस! मात्र सुपर 8 मधून बाहेर पडूनही पाकिस्तान 'या' कारणामुळं T20 World Cup 2026 साठी थेट पात्र

Samata Parishad : छगन भुजबळ वेगळी भूमिका घेणार? समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी?

T20 World Cup: अमेरिकेकडून खेळणाऱ्या हरमीतने रोहितच्या कोचला दिलं श्रेय! म्हणाला, 'त्यांनीच माझ्यात...'

Mumbai Local : गुड न्यूज! मुंबई लोकल धावणार 'टाईम टू टाईम', रेल्वेकडून 'हे' मोठे बदल

SCROLL FOR NEXT