District Collector abhinav Goyal while inspecting the work of voter registration in the Election Branch at the Tehsil Office esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : महसूल, गौणखनिजची शंभर टक्के वसुली करा : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

शिंदखेडा तहसील विभागात महसूल व गौणखनिज वसुलीचे प्रमाण अत्यल्प असल्याने दिलेला वसुलीचा इष्टांक शंभर टक्के पूर्ण करून वसुलीच्या इष्टांक पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शिंदखेडा तहसील विभागात महसूल व गौणखनिज वसुलीचे प्रमाण अत्यल्प असल्याने दिलेला वसुलीचा इष्टांक शंभर टक्के पूर्ण करून वसुलीच्या इष्टांक पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.

कुणीही कामात कुचराई करू नये, असे शुक्रवारी (ता. ५) सकाळी आकराच्या सुमारास शिंदखेडा येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले. (Collector Abhinav Goyal statement of Recover 100 percent of revenue, minor minerals dhule news)

शिंदखेडा येथील तहसील कार्यालयात शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकरी गोयल यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील महसूल मंडळ अधिकारी व तलाठी यांची सयुक बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी तालुक्यातील महसूल मंडळनिहाय कामकाजाचा आढावा घेतला.

तालुक्यातील जमीन महसूल व गौणखनिज वसुलीबाबत दिलेले इष्टांक पूर्ण करण्याबाबत सूचना देत चुकीची माहिती देणाऱ्या महसूल मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

शिंदखेडा तालुक्यात महसुलीचा वसुली इष्टांक चार कोटी ४५ लाख असून, आजपावेतो दोन कोटी ७० लाख वसुली करण्यात आली आहे. सरासरी ५२ टक्के जमीन महसुलाची वसुली झाली आहे. वसुली शंभर टक्के करणे आवश्यक असल्याची सूचना देण्यात आल्या.

गौणखनिज वसुली इष्टांक सहा कोटी ९९ लाख असून, आजपावेतो तीन कोटी नऊ लाख रुपये वसुली ४५ टक्के करण्यात आली आहे, अशी माहिती या वेळी बैठकीत देण्यात आली. शिंदखेडा महसूल विभागाचा जमीन महसूल व गौणखनिज वसुली इष्टांकापेक्षा फक्त पन्नास टक्के झाली असल्याचे निदर्शनात आले आहे.

दोंडाईचा अपर तहसील कार्यालयाला जमीन महसुलीचा इष्टांक दोन कोटी ९३ लाख देण्यात आला असून, यापैकी दोन कोटी ८५ लाख रुपये वसुली करण्यात आली आहे.

गौणखनिज तीन कोटी ३५ लाख वसुलीचा इष्टांक दिला असून, एक कोटी ४० लाख आजपावेतो वसूल करण्यात आली असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली आहे.

दोंडाईचा अपर तहसील कार्यालयात जमीन महसूल इष्टांक जवळपास पूर्ण झाला असून, गौणखनिज इष्टांक मात्र फार कमी असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे शिंदखेडा महसूल विभाग व दोंडाईचा अप्पर तहसील महसूल विभागाने जमीन महसूल व गौणखनिज वसुलीच्या बाबत अधिक सक्तीने कारवाई करण्याची आवश्यकता असल्याच्या सूचना जिल्हाधिकारी गोयल यांनी दिल्या.

मतदार नोंदनीची पाहणी

जिल्हाधिकारी गोयल यांनी निवडणूकविषय कामकाजाची पाहणी करून दुबार मतदारांचे नाव वगळणे, नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांचे नाव कमी करणे याबाबत काय कार्यवाही करावी, याबाबत सूचना करीत मार्गदर्शन केले‌. आगामी काळात निवडणूक होणार असून, यासाठी खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन केले.

सकाळी अकरला सुरू झालेली बैठक दुपारी अडीचपर्यंत सुरू होती. या वेळी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, शिरपूर उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, दोंडाईचा प्रभारी अप्पर तहसीलदार घोलप, नायब तहसीलदार बी. डी. वाडीले, निवडणूक नायब तहसीलदार नितेंद्रसिंह राजपूत, संजय राणे आदी उपस्थित होते.

चिलाणे महसूल मंडळ अधिकारी अशोक भामरे यांनी जमीन महसुल वसुलीबाबत चुकीची माहिती दिल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी गोयल यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजविण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

SCROLL FOR NEXT