Polio Vaccination esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Polio Vaccination : बालकांना ३ मार्चला देणार पोलिओ लस : जिल्हाधिकारी गोयल

जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात एकूण एक लाख ८८ हजार ४७० बालकांना रविवारी ३ मार्चला पोलिओ लस देण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात एकूण एक लाख ८८ हजार ४७० बालकांना रविवारी ३ मार्चला पोलिओ लस देण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत एकही बालक वंचित राहू नये यासाठी पोलिओ लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यंत्रणेला दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हा कार्यबल समितीची बुधवारी (ता. ७) बैठक झाली. (Collector Goyal statement Polio vaccine will be given to children on March 3 dhule news)

श्री. गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत भदाणे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सचिन बोडके.

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सोनिया बागडे, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. तरन्नुम पटेल, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. मोरे, जिल्हा हिवताप अधिकारी अ. रा. पाटील, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. एम. आर. शेख यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितले, की केंद्र सरकारने पोलिओ निर्मूलनासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील निर्धारित बालकांच्या लसीकरणासाठी जिल्ह्यात एकूण एक हजार ६३७ पोलिओ बूथ असतील.

यात ९५ मोबाईल टीम शहरी व ग्रामीण भागात काम करणार आहेत. तसेच बसस्थानके, रेल्वेस्थानक, टोलनाके, जेथे प्रवासाच्या दरम्यान ये-जा असते अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार ट्रांजिस्ट टीमचे आयोजन करण्यात आले असून, एकूण ७२ ट्रांजिस्ट टीम काम करणार आहे़त.

या मोहिमेमध्ये पालकांनी घरातील व परिसरातील शून्य ते पाच वयोगटातील बालकांना जवळच्या लसीकरण बूथवर नेऊन पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा लाभ मिळवून द्यावा.

सर्व पालकांनी आठवणीने रविवारी बालकाला पोलिओची लस देऊन जिल्ह्याचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गोयल, सीईओ गुप्ता, जिल्हा शल्कचिकित्सक डॉ. देगावकर, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बोडके यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope : 12 तारखेपासून सुरू होतोय गजकेसरी राजयोग! वृषभसह 4 राशीचं भाग्य उजळणार; होणार धनलाभ, प्रेमात यश, मोठं स्वप्न होईल पूर्ण

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

SCROLL FOR NEXT