Nandurbar district collector Manisha Khatri esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News | लम्पीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित पशुबाजार, गुरांची वाहतूक पूर्ववत

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात लम्पी स्किन डिसिज रोगाचा प्रादुर्भाव आढळल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांची ने-आण करण्यास व खरेदी-विक्री व प्राण्यांचे बाजार भरविण्यास मनाई करण्यात आली होती.

लम्पी प्रादुर्भावाच्या प्रार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय व तालुकानिहाय आढावा बैठकीत जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, शहादा व तळोदा तालुक्यातील प्राणी बाजार भरविणे व जिल्ह्यांतर्गत गुरांची वाहतूक करण्यास पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहून सुरू करीत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा मनीषा खत्री यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिले. (Collector Manisha Khatri order Banned cattle market in wake of Lumpy restores cattle traffic Nandurbar News)

जिल्ह्यांतर्गत गुरांची वाहतूक करण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गुरांचे लम्पी चर्मरोगाकरिता २८ दिवसांपूर्वी प्रतिबंधक लसीकरण झालेले असावे. वाहतूक करावयाच्या गुरांची ओळख पटविण्यासाठी गोजातीय प्रजातींच्या कानात टॅग नंबर असणे तसेच इनाफ पोर्टलवर नोंदणी असणे बंधनकारक राहील.

संक्रमित नसलेल्या क्षेत्रातून गुरांची वाहतूक करण्यासाठी आवश्यक ते आरोग्य प्रमाणपत्र बंधनकारक असून, ते देण्यासाठी राज्य शासनाच्या, जिल्हा परिषदेकडील पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी गट अ पेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकारी यांना सक्षम अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

गुरांची वाहतूक करताना आरोग्य दाखला तसेच जनावरांची वाहतूक अधिनियम २००१ मधील नियम ४७ अन्वये स्वास्थ्य प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील. कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, प्रक्षेत्रे व पशुबाजारामध्ये यापुढे टॅगिंग व रोगप्रतिबंधक लसीकरणाची खात्री झाल्याशिवाय गुरांची खरेदी-विक्री करू नये.

आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पशुसंवर्धन विभाग, पोलिस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, उपनिबंधक, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी संस्था व अन्य आनुषंगिक प्रशासकीय विभागाने आदेशाचे पालन करावे, असेही आदेशात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

Gen Z Fashion Trends 2026: आउटडेटेड झालेल्या वायर इअरफोनच्या प्रेमात Gen Z, फॅशनमध्ये का परतला रेट्रो टच?

SCROLL FOR NEXT