drought esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : तालुक्यासाठी दुष्काळाच्या सवलती लागू : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : तालुक्यात पाऊस कमी झाल्याने शासनाने निकषानुसार नंदुरबार तालुक्याचा दुष्काळग्रस्त भागात समावेश केला आहे.

तसे आदेश शासनाने काढले असून नंदुरबार तालुक्यासाठी दुष्काळाच्या सवलती लागू केल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी दिली.(Collector Manisha Khatri statement of Drought concessions applicable for district nandurbar news)

जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी दिलेल्या प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृद आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित झालेल्या जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करून सवलती लागू केल्या आहेत.

नंदुरबार तालुक्यासाठी लागू असलेल्या सवलती

- जमीन महसुलात सूट

- पीक कर्जाचे पुनर्गठन

- शेतीच्या निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती

-कृषी पंपाच्या चालु वीजबिलात ३३.५ टक्के सूट

- शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी

- रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काहीअंशी शिथिलता

- आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर

- टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडित न करणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT