Inspector A along with mobile phone and bike seized from the suspects. S. Agarkar and Associates  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : युवतीला मारहाण करून मोबाईल हिसकावला; वय 24, गुन्हे 17

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर (जि. धुळे) : महाविद्यालयीन युवतीला मारहाण करून तिचा मोबाईल हिसकावून फरारी झाल्याच्या गुन्ह्यात शहर पोलिसांनी दोन संशयितांना तातडीने अटक केली. (college girl was beaten up and her mobile taken away by suspect criminal dhule crime news)

संशयितांचा अवघ्या आठ तासांत छडा लावून हिसकावलेल्या मोबाईलसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली. संशयितांपैकी एक सराईत गुन्हेगार असून, त्याच्याकडील दुचाकीही चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

गोगापूर (ता. शहादा) येथील रहिवासी असलेली १८ वर्षीय युवती शिक्षणासाठी शहरात राहते. २९ मार्चला सायंकाळी पाचला मैत्रिणीसोबत ती बाहेर पडली. मोबाईलवर बोलत करवंद नाका परिसरातील चामुंडादेवी मंदिराजवळ आली असता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तिच्याजवळ थांबून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला.

तिने प्रतिकार केल्यावर संशयितांनी तिला कानशिलात लगावली. धक्काबुक्की करीत मोबाईल घेऊन संशयित भरधाव फरारी झाले. युवतीने ही घटना घरमालकाला सांगितली. त्यांनी पोलिस ठाण्यात येऊन माहिती दिली. आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेल्याच्या संशयावरून अज्ञात संशयितांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

निरीक्षक ए. एस. आगरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे माहिती घेतली. त्यात पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार दिलीप सुदाम कोळी याचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले. ३० मार्चला रात्री पावणेबाराला संशयितांना मांडळ (ता. शिरपूर) येथील प्रवेशद्वाराजवळ ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

संशयितांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरलेला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली एचएफ डीलक्स दुचाकी (जीजे ०५, जीके ९५४२) जप्त करण्यात आली. दिलीप कोळी (वय २४) व तुकाराम गोविंद ढिसले (मराठे, ३५) अशी संशयितांची नावे असून, दोघेही शहरातील वाल्मीकनगर येथील रहिवासी आहेत. त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी दिली.

वय २४, गुन्हे १७

संशयितांकडे आढळलेल्या दुचाकीबाबत चौकशी केल्यावर ती चोरीची असल्याचे आढळले. म्हसदी (ता. साक्री) येथून संशयिताने ती चोरल्याचे निष्पन्न झाले.

दिलीप कोळी हा हिस्ट्रिशीटर असून, त्याच्याविरोधात शहर पोलिसांत पाच चोऱ्या व तीन घरफोडी, दोन जबरी चोऱ्या, दोंडाईचा पोलिस ठाण्यात एक चोरी, जळगाव जिल्ह्यात अमळनेर पोलिसांत एक चोरी, अडावद पोलिस ठाण्यात एक चोरी, नंदुरबार तालुका पोलिसांत चोरीचा एक, शहादा पोलिसांत चोरीचा एक, गुजरातमधील कडोदरा (सुरत) पोलिसांत चोरीचा एक, नाशिक जिल्ह्यात मालेगाव येथे छावणी पोलिसांत चोरीचा एक असे एकूण १७ गुन्हे दाखल आहेत.

त्याच्याकडून चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए. एस. आगरकर, शोध पथकाचे हवालदार ललित पाटील, लादूराम चौधरी, पोलिस नाईक मनोज पाटील, विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, मुकेश पावरा, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, सचिन वाघ आदींनी ही कामगिरी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction to Sheikh Hasina death sentence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची पहिली प्रतिक्रिया!

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

SCROLL FOR NEXT