bribe crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Bribe Crime : 10 हजाराची लाच घेताना पोलिस निरीक्षकासह शिपाई ताब्यात

२१ हजाराची लाचेची मागणी करून दहा हजार रुपये रोख स्वीकारताना सारंगखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप उत्तमराव पाटील व चालक पोलिस शिपाई गणेश भामट्या गावित या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा पथकाने रंगेहाथ पकडले.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Bribe Crime : सारंगखेडा येथील यात्रेनिमित्त दारू वाहतुकीचा व्यवसाय करू देण्यासाठी २१ हजाराची लाचेची मागणी करून दहा हजार रुपये रोख स्वीकारताना सारंगखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप उत्तमराव पाटील व चालक पोलिस शिपाई गणेश भामट्या गावित या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा पथकाने रंगेहाथ पकडले.

शनिवारी (ता.२३) ही घटना घडली.(Constable along with police inspector detained while accepting bribe of 10 thousand nandurbar crime news)

सारंगखेडा (ता.शहादा) येथे श्री दत्त प्रभूंची यात्रोत्सव सुरू झाला आहे. या यात्रेत एका मद्य व्यावसायिकास दारू वाहतूक करण्यास परवानगी मिळावी म्हणून त्याने पोलिस निरीक्षकांशी संपर्क केला.

त्याबदल्यात त्याच्याकडे २१ हजाराची लाचेची मागणी पोलिस निरीक्षक संदीप पाटील व पोलिस शिपाई गणेश गावित यांनी केली. त्यानंतर दहा हजारात तडजोड झाली. याप्रकरणी व्यावसायिकाने नाशिक लाचलुचपत विभागाकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली.

तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक येथील पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी शनिवारी (ता.२३) सारंगखेडा येथे सापळा रचला.

ठरल्यानुसार दहा हजाराची रक्कम स्वीकारताना पोलिस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचा वाहन चालक शिपाई गणेश गावित या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. हवालदार सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी यांचा पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Kadam: ''बाळासाहेबांच्या बॉडीला उद्धव का त्रास देतोय'' शरद पवारांचे शब्द; त्यांनाही 'मातोश्री'वर रोखलं होतं!

आईशिवाय वाढलेली तू... सायलीचा अपमान होताच भडकणार प्रतिमा; प्रियाच्या कानशिलात लगावणार, आजच्या भागात काय घडणार?

Mystery of Umoja Village : 'या' गावात पुरुषांना आहे प्रवेशबंदी, तरीही महिला होतात गर्भवती; काय आहे गूढ जाणून घ्या....

Stock Market Closing: शेअर बाजाराने घेतला यू-टर्न; सेन्सेक्स निफ्टी वाढीसह बंद, कोणते शेअर्स तेजीत?

Mumbai Metro Aqua Line: मुंबईमध्ये धावत्या भूमिगत मेट्रोत उडाल्या ठिणग्या; प्रवाशांत घबराट अन्...

SCROLL FOR NEXT