Gram Panchayat
Gram Panchayat Gram Panchayat
उत्तर महाराष्ट्र

कोरोनाच्या सावट..धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची आर्थिक कोंडी

सकाळ डिजिटल टीम


धुळे:
ग्रामीण विकास समोर ठेवून सुरू झालेल्या केंद्र व राज्य शासनाच्या (Central and State Governments) अनेक योजनांचा निधी संसर्गजन्य कोरोनावरील (corona) उपाययोजनांसाठी वळता केल्याने या ग्रामीण योजनांच्या उद्दिष्टालाच धक्का बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साडेपाचशेच्या वर ग्रामपंचायतींची (Gram Panchayats) आर्थिक कोंडी झाली आहे.

(corona effect by dhule district five hundred gram panchayats financial crisis)


केंद्र सरकारकडून मिळणारा चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाचा निधी असो किंवा जिल्हा विकास योजनेचा निधी, यातून दोन वर्षांपासून कोरोनाच्या उपाययोजनांवर म्हणजे विकासेत्तर कामांसाठी निधी वळता केला जात आहे. शिवाय आमदार निधीतूनही ५० लाख रुपये कोरोनासंबंधी वैद्यकीय उपकरणांसाठी खर्च करण्याची मुभा दिली आहे. या योजनांच्या निधीतून ग्रामविकासाची कामे केली जातात. पंचायतराज व्यवस्थेत ग्रामीण विकास हा केंद्रबिंदू ठेवून केंद्र सरकारकडून थेट ग्रामपंचायतींना निधी दिला जातो. सात लाखांपासून पुढे १५ लाखांपर्यंत साधारणपणे लहान किंवा मध्यम लोकसंख्येच्या गावांना निधी दिला जातो.

निधी वळती करण्याची सूचना
ग्रामविकासाच्या आराखड्यानुसार तो खर्च करावा लागतो. धुळे जिल्ह्यात ५५२ ग्रामपंचायतींच्या अखत्यारित ६८१ मोठी गावे आहेत. दोन वर्षांपासून आराखड्याबाहेर जाऊन राज्य शासनाने ग्रामपंचायतींना हा निधी कोरोना उपाययोजनांवर खर्च करण्यास सांगितले. जिल्हा विकास निधीतूनही ३० टक्के रक्कम वळती केली जात आहे. आमदारांच्या विकासनिधीत दोन वर्षांत दुप्पट वाढ केली असली तरी त्यांनाही ५० लाख रुपये कोरोना उपाययोजनांवर खर्च करण्याचे बंधन घातले आहे. कोरोनावरील नियंत्रण महत्त्वाचे असले तरी ग्रामविकासही तितकाच आवश्यक आहे. दोन वर्षांपासून शासनाकडून ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या विविध योजनांचा निधी कोरोना उपाययोजनेच्या नावाखाली वळता केला जात आहे. वित्त आयोगाचा निधी तर केंद्राचा असला तरी तो घेतला जात आहे. या निधीतून यंदा विजेची देयके भरण्यास सांगितले आहे. मग विकास करायचा कसा, असा प्रश्‍न ग्रामपंचायतींपुढे आहे.


ग्रामपंचायतनिहाय गावांची संख्या
तालुका ........ ग्रामपंचायत ......... गावे

धुळे ............ १४१ ........... १६८
साक्री ........... १६९ ........... २२५
शिरपूर .......... ११८ .......... १४७
शिंदखेडा ........ १२४ .......... १४१
एकूण ............ ५५२ .......... ६८१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडिल पोलिसांच्या ताब्यात; संभाजीनगरमधून केले अटक

Mumbai Election: सोमवारी ठाकरे गटाच्या पोलिंग एजेंटचा टॉयलेटमध्ये मृत्यू, तर निवडणूक अधिकाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

Yoga Tips : थकवा अन् अशक्तपणापासून आराम मिळवण्यासाठी दररोज करा 'ही' योगासने, जाणून घ्या सरावाची पद्धत

Kalyani Nagar Accident : पुणेकरांच्या तीव्र प्रतिक्रिया...फक्त सामान्य नागरिकांनाच कायदे लागू आहेत का?

Latest Marathi News Live Update: 300 ग्रामपंचायतींच्या प्रशासक नियुक्तीला स्थगिती

SCROLL FOR NEXT