उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्यात कोविड रुग्णालयातील सव्वाआठशे बेड रिकामे

धनराज माळी



नंदुरबार : जिल्ह्यातील शासकीय व खासगी २८ रुग्णालयांमध्ये (government and private hospitals) दोन महिन्यांपूर्वी रुग्णांना बेड (patients Beds) मिळणे दुरापास्त झाले होते. अशा स्थितीत अक्षरशः जमिनीवर गाद्या टाकून रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आरोग्य विभागावर आली होती. मात्र त्याच रुग्णालयात (hospitals) आता पाहिजे तेवढे बेड रुग्णांअभावी ( No patient) रिकामे पडले आहेत. शासनाच्‍या नियमांची अंमलबजावणी, प्रशासनाचे मार्गदर्शन, योग्य नियोजन आणि आरोग्य यंत्रणेने दिलेली अहोरात्र सेवा यामुळेच जिल्ह्यातील कोविड रुग्णांची (coron patient low) संख्या घटत आहे.

(nandurbar district coron patient low hospitals patients beds empty)

१५ महिन्यांपासून कोरोनाने कहर सुरू केला आहे. नंदुरबार जिल्हा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत चांगल्या प्रकारे कोविडशी लढा देण्यात यशस्वी ठरला आहे. सुरुवातीला ग्रीन झोनमध्ये असलेला नंदुरबार जिल्हा गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ‘रेड झोन’मध्ये गेला होता. त्याला मुख्य कारण म्हणजे स्थलांतरित मजूर, कामगार व नोकरदारांची गावाकडे सुरू झालेली वाटचाल. तरीही आरोग्य विभागाच्या कमी आरोग्य कर्मचाऱ्यांवरच प्रशासनाने योग्य नियोजन करीत परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली. त्यानंतर पुन्हा या वर्षात मार्च व एप्रिलमध्ये कोरोनाचा उद्रेक झालाच.
रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत होती. तसेच मृत्यूंची संख्याही वाढली होती. अक्षरशः मृत्यूशय्येवरही मृतांना अंत्यविधीसाठी वेटिंग करावी लागत होती. एवढी गंभीर परिस्थिती जिल्ह्यात होती. तरीही प्रशासनाने परिस्थिती हाताळत आवश्‍यक असलेला ऑक्सिजन किंवा मेडिसिनची कमतरता भासणार नाही याचे योग्य नियोजन केले. देशात सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा असताना नंदुरबार जिल्ह्यात तशी वेळ आली नाही. केवळ रुग्णसंख्येच्या तुलनेत तोकडे आरोग्य कर्मचारी व बेडची संख्या याचीच अडचण होती. अशा स्थितीत रुग्णालयात जमिनीवरही बेड टाकून रुग्णांवर उपचार करून त्यांचा जीव वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला. आता जिल्ह्यात चार ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित झाले आहेत.

रुग्णसंख्या आटोक्यात
जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व पोलिस यंत्रणा यांची अहोरात्र मेहनत, योग्य नियोजन, स्वॅब तपासणीला प्राधान्यामुळे व त्यानंतर नियमांचे पालन करण्याची सक्ती आदी बाबींमुळे रुग्णांमध्ये जाणीव जागृती निर्माण झाली. लक्षणे दिसताच रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली होती. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही कमी झाले. योग्यवेळी उपचार मिळाल्याने संसर्ग वाढण्यास पायबंद घालता आला. त्यामुळेच रुग्णसंख्येत हळूहळू का होईना घट झाली.


अशी आहे रिकाम्या बेडची संख्या
जिल्ह्यात शासकीय सात व खासगी २१ असे २८ कोविड रुग्णालय कार्यान्वित आहेत. येथे बेड मिळणे दुरापास्त होते. मात्र कोविड नियंत्रणात येत असल्याने आता रुग्णालयांमधील गर्दी ओसरली आहे. रुग्णसंख्या कमी झाली आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये ४१० बेड आहेत. त्यांपैकी केवळ १७३ रुग्ण उपचार घेत आहेत. तर २३७ बेड रिकामे आहेत. तर खासगी कोविड रुग्णालये २१ आहेत. त्यात ७८६ बेड आहेत. त्यांपैकी केवळ २०६ बेडवर रुग्ण आहेत. ५८० बेड रिकामे आहेत. असे एकूण ८१७ बेड सद्यःस्थितीत रिकामे आहेत.
(nandurbar district coron patient low hospitals patients beds empty)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. प्रणिती शिंदे, आदिती तटकरे, शाहू महाराजांनी केलं मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

SCROLL FOR NEXT