While the purchase of Cotton Village is in progress. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Cotton Crisis : हताश शेतकरी विकताहेत कापूस! दुष्काळातही कापूस गडगडलेलाच

पावसाअभावी २०२३ मधील खरीप हंगाम वाया गेला. अवघे २०-३० टक्के उत्पादन आले. नगदी कडधान्याचे पीक आलेच नाही. कापसाचे उत्पादनही घटले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Cotton Crisis : पावसाअभावी २०२३ मधील खरीप हंगाम वाया गेला. अवघे २०-३० टक्के उत्पादन आले. नगदी कडधान्याचे पीक आलेच नाही. कापसाचे उत्पादनही घटले. दुष्काळ पडला. दुष्काळी स्थितीमुळे बागायतीसह कोरडवाहू कापसाला बऱ्यापैकी चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती.

सात हजारांपेक्षा अधिक भाव न सरकल्याने नाराज झाले. आता मिळेल त्या भावाने कापसाची विक्री करीत आहेत. (Cotton crop prices decreased Desperate farmers sell cotton Even during drought Dhule agriculture news psl98)

खानदेशातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ आहे. बागायती कापसाचे उत्पादन एकरी दोन क्विंटलपेक्षा अधिक नाही. कोरडवाहूचे उत्पादन अवघे क्विंटलपेक्षा कमी आहे. हंगाम संपून दोन-अडीच महिने उलटल्यानंतरही कापसाचे भाव वाढलेले नाहीत. प्रतिक्विंटल सात हजारांच्या आतबाहेरच दर आहेत.

आता शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावाने विक्री सुरू केली आहे. घरात ठेवलेल्या कापसाने खाजरे वाढविले आहे. अधिकचा आजार जडविण्यापेक्षा विक्री करण्यास प्राधान्य दिले जात आहे.

गेल्या दोन वर्षांपूर्वी १५ हजारांचा दर मिळाला होता. दुष्काळामुळे या वेळेसही भाव वाढतील, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र आशेवर पाणी फिरल्याचे शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष आत्माराम पाटील, नारायण माळी, भगवान पाटील, राजेंद्र माळी, विश्वासराव देसले, संभाजी पाटील, शालिग्राम पाटील, सुनील दंगल पाटील आदींनी सांगितले.

"शासनाचे धोरण कुचकामी आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कापसाचे भाव वाढतील, असे वाटले होते. पण केंद्राने आशा धुळीस मिळविली." -भय्या बोरसे, कापूस उत्पादक शेतकरी, कापडणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT