crime news esakal
उत्तर महाराष्ट्र

शिरपुरात 23 सावकारांविरोधात गुन्हा; थकबाकी दाखवून उचलले साहित्य

शिरपुरात तब्बल २३ जणांविरोधात अवैध सावकारीचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर (जि. धुळे) : आजीच्या कर्करोगावरील उपचारासाठी घेतलेल्या पैशांच्या मोबदल्यात भरमसाट व्याज आणि मुद्दल वसूल केल्यानंतरही घरातील वस्तू उचलून घेऊन जाणाऱ्या २३ सावकारांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी अवैध सावकारांविरोधात मोहीम उघडली असतानाच शिरपुरात तब्बल २३ जणांविरोधात अवैध सावकारीचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. संशयितांमध्ये शिरपूरातील २२ तर पुणे येथील एकाचा समावेश आहे.

कुणाल हरीलाल जुलवाणी (वय २७) याने शहर पोलिसात याबाबत फिर्याद दिली. त्याच्या आजीला कर्करोग असल्यामुळे तिच्या उपचारासाठी त्याच्या वडिलांनी बँकेचे कर्ज काढले होते. कर्जाचे हप्ते थकल्यामुळे ते भरण्यासाठी त्यांना व्याजाने पैसे देणाऱ्या सावकारांची माहिती मिळाली. २०२० मध्ये त्याने संशयितांकडून वेळोवेळी पैसे घेतले. एकूण ३४ लाख पाच हजार रुपये घेतल्यानंतर त्याची परतफेड ऑनलाइन व रोखीने करुन संशयितांना तब्बल ४९ लाख ४३ हजार रुपये परत केले. मात्र त्यानंतरही थकबाकी असल्याचे दाखवून संशयित कुणालच्या घरातून लॅपटॉप, स्पीकर, लाऊडस्पीकर, मोबाईल अ‍ॅसेसरिज असे साहित्य उचलून घेऊन गेले. थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्याकडून स्टँप पेपरवर लिहून घेणे, सह्या केलेले कोरे धनादेश घेणे असे प्रकारही त्यांनी केले. कुणालचे वडील शिक्षक असून, त्यांच्या शाळेवर जाऊन धमकी दिली. त्याचे काका गोपाल मारवाडी यांच्या दुकानावर जाऊन धुमाकूळ घातला. अखेर जुलवाणी यांनी कंटाळून शिरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

हे आहेत संशयित सावकार

संशयितांमध्ये मनोज गुलाबराव पाटील, उमेश संतोष पाटील, विवेक शिरीष पाटील, निश्चय योगेंद्र ललवाणी, जगदीश राजेंद्रसिंह गिरासे, किरण पांडुरंग मराठे, शशीपाल चंद्रसिंह जमादार, रुद्रसिंह सुभाषसिंह राजपूत, सागर वसंत माळी, चेतन रवींद्र पाटोळे, कृष्णा कुबेर पारधी, रवींद्र हिरामण खजुरे, राहुल नारायण झांजरे, भूषण गोपाल पाटील, चेतन सुभाष माळी, अमोल गोपाल सोनवणे, अविनाश राजू बैसाणे, संजय पाटील, महेश कोळी, रोहित भोई, सागर मधुकर मराठे, सागर भाटपुरे (सर्व रा.शिरपूर) व रोहन राजू राऊत (रा.पुणे) यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT