crime  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : 5 लाखांचा गंडा; दोघांविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : संशयित दोघांनी येथील देवपूर भागातील देवरे अ‍ॅक्सिडेंट हॉस्पिटल अ‍ॅन्ड प्रथमेश क्रिटिकल सेंटरचे डॉ. पंकज देवरे यांना पाच लाखांत गंडा घातला असून, ही घटना मंगळवारी उघडकीस आली.

सीटी स्कॅन मशिन घेण्याचे आमिष दाखवत ही फसवणूक केली.()

या प्रकरणी मुंबई व येरवड्यातील दोघांवर गुन्हा दाखल झाला. याबाबत डॉ. पंकज श्‍यामराव देवरे (वय ४५) यांनी देवपूर पोलिसांकडे फिर्याद दिली.

त्यानुसार महेश चौधरी (रा. आझादनगर, मजला सेवरे बस डेपोजवळ, मुंबई) व मनीष अशोक अग्रवाल (रा. प्रतीकनगर, मित्तल सोसायटी, येरवडा, पुणे) या दोघांनी अ‍ॅक्सिस बँक शाखा, ऐरोवली, ठाणे येथे नोकरीस असल्याचे सांगत रिव्हाइज लोन घेण्याचे आमिष दाखवून डॉ. देवरे यांना दोघांच्या बँक खात्यात पैसे वर्ग करण्यास भाग पाडले.

डॉ. देवरे यांचा विश्वासघात करीत त्यांनी सांगितल्याप्रमाणे कोणतेही कर्ज मंजूर केले नाही. नंतर डॉ. देवरे यांनी बँकेच्या वरिष्ठांकडे तक्रार केली. पुढे २९ लाख ९० हजार रुपये परत केले. मात्र, पाच लाख १० हजार रुपये परत दिले नाहीत.

वेळोवेळी खोटे धनादेश देऊन, डीडीने पैसे पाठविल्याचे खोटे मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवून डॉ. देवरे यांची फसवणूक केली. हा प्रकार २० सप्टेंबर ते ६ मे २०२३ दरम्यान घडला. या प्रकरणी संशयित दोघांवर गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper Train: प्रतीक्षा संपली! देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ शनिवारपासून धावणार

Raj Thackeray: निवडणूक की लिलाव? १५ कोटींची ऑफर, तरीही नकार! पैसे वाटपावर राज ठाकरेंचा मोठा खुलासा, सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

सोलापुरातील धक्कादायक घटना! रिमांड होममधून अल्पवयीन मुलगा, तर घरगुती वादातून सखी वन टॉप सेंटरमध्ये आलेली विवाहिता बेपत्ता; पोलिस घेत आहेत दोघांचा शोध

Mumbai Politics: आरोप, वस्तुस्थिती आणि राजकीय संदर्भ... मुंबई खरंच विकली जातेय का? अदानी समूहावर बोट; पण वास्तव काय सांगतं?

Puja Khedkar Robbery : पूजा खेडकर यांच्या बंगल्यावर मध्यरात्री दरोडा; नोकरानेच आखला कट!

SCROLL FOR NEXT