ST bus esakal
उत्तर महाराष्ट्र

MSRTC Bus : धुळे आगाराला रोज 20 लाखांचे उत्पन्न

एसटी महामंडळाच्या धुळे आगारातून बससेवा आता पूर्वपदावर येत आहे. आगारातून एसटीच्या रोज ३४७ फेऱ्या होत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : एसटी (ST bus) महामंडळाच्या धुळे आगारातून बससेवा आता पूर्वपदावर येत आहे. आगारातून एसटीच्या रोज ३४७ फेऱ्या होत आहेत. रोज ४५ ते ५० हजार किलोमीटर बस प्रवासातून १८ ते २० लाखांचे उत्पन्न प्राप्त होत असल्याची माहिती आगारप्रमुख अनुजा दुसाने यांनी दिली.

एसटीचे शासनात विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी राज्यभर २८ नोव्हेंबरपासून बेमुदत संप केला होता. त्यामुळे बससेवा ठप्प झाली होती. संप मिटावा व सेवा पूर्ववत सुरू व्हावी, यासाठी शासनाने कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या सोडविल्या. मात्र, शासकीयसेवेत विलिनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम होते. त्यामुळे त्यांनी संप सुरूच ठेवला होता. अखेर या मागणीसाठी आयोग स्थापन करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्यानुसार आयोगाची नियुक्ती झाली. त्यानंतर आयोगानेदेखील एसटी कर्मचाऱ्यांच्या शासकीय सेवेतील विलिनीकरणाला नकार दिला. तसा अहवाल न्यायालयात सादर झाला. न्यायालयाने आयोगाच्या अहवालाची दखल घेत कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचा आदेश दिला. अखेर एसटी कर्मचारीही २४ एप्रिलपासून कामावर हजर झाले. त्यामुळे आता बससेवा पूर्वपदावर येत आहे. आगारातून रोज ३४७ फेऱ्या होत आहेत. ४५ ते ५० हजार किलोमीटरच्या प्रवासातून धुळे आगाराला रोज २० लाखांचे उत्पन्न मिळत आहे.

सोळा ठिकाणी बसेस मुक्कामी

धुळे आगारातून पुण्यासाठी रोज अकरा फेऱ्या होत आहेत. नाशिकसाठी वीस बसेस रोज धावत आहेत. पहाटे साडेपाच वाजता नंदुरबार, अक्कलकुवा मार्गे अहमदाबादसाठी बससेवा सुरू केली आहे. सुरत, वापी बसेस नियमित सोडल्या जात आहेत. धुळे ते खुंटामोडी बस सुरू झाली आहे. जिल्ह्यातील सोळा ठिकाणी बसेस मुक्कामी थांबत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT