dancer gautami patil father found in dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Gautami Patil : नृत्यांगना गौतमी पाटीलचे वडील मरणासन्नावस्थेत; स्वराज्य फाउंडेशनकडून जिल्हा रुग्णालयात दाखल

सकाळ वृत्तसेवा

Gautami Patil : ठसकेबाज नृत्याच्या माध्यमातून राज्याला परिचित आणि तरुणाईमध्ये क्रेझ असलेली नृत्यांगना गौतमी पाटील हिचे वडील धुळे शहरात बेवारस, मरणासन्नावस्थेत आढळले.

त्यांना स्वराज्य फाउंडेशनचे प्रमुख दुर्गेश चव्हाण यांनी हिरे मेडिकल कॉलेजच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. श्री. चव्हाण यांना संबंधित रुग्ण कोण हे माहीत नव्हते. त्यांनी रुग्णाच्या आधारकार्डव्दाद्वारे सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केल्यावर ओळख पटू शकली. (dancer gautami patil father found in dhule news)

स्वराज्य फाउंडेशनचे प्रमुख चव्हाण बेवारस व्यक्तींच्या मदतीसाठी धडपडत असतात. त्यांना शहरातील सुरत बायपासजवळ अजळकरनगरात गुरुवारी (ता. ३१) एक व्यक्ती निपचित पडून असल्याची माहिती मिळाली. सायंकाळनंतर त्या व्यक्तीला श्री. चव्हाण व गणेश ढापसे यांनी वाहनातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

नंतर वॉर्ड क्रमांक ३५ मध्ये संबंधित व्यक्तीवर उपचार सुरू झाले. खिशात आढळलेल्या आधारकार्डच्या आधारे त्या व्यक्तीचे नाव रवींद्र बाबूराव पाटील (रा. वेळोदे, ता. चोपडा, जि. जळगाव) असल्याचे समोर आले. या व्यक्तीशी संबंधितांनी संपर्क साधावा यासाठी श्री. चव्हाण यांनी सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केले.

रवींद्र पाटील यांच्या भावजय शोभा आनंद नेरपगार (पाटील) मुलीसह जिल्हा रुग्णालयात पोचल्या. त्या नाशिकला वास्तव्यास आहेत. गेल्या काही वर्षांपासून वेळोदे येथे रवींद्र पाटील आणि त्यांचे वडील म्हणजेच शोभाबाईंचे सासरे दोघेच राहत होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यांना शोभाबाई किराणा देत होत्या. गेल्या वर्षी शोभाबाई यांचे सासरे वारले. त्यामुळे रवींद्र पाटील यांची आबाळ होऊ नये म्हणून कर्तव्यभावनेतून शोभाबाई किराणा देतच होत्या. श्री. पाटील हे नृत्यांगना गौतमी पाटील हिचे वडील असल्याच्या वृत्ताला शोभाबाई आणि जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनानेही दुजोरा दिला.

अशी पटली ओळख

रवींद्र पाटील यांची पत्नी आणि मुलगी गौतमी गेल्या पंधरा वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास आहेत. रवींद्र पाटील यांच्यापासून पंधरा वर्षांपूर्वी गौतमी आणि तिची आई विभक्त झाले. नंतर गौतमी शिंदखेड्यात मामांकडे वाढली. आठवीपर्यंतच्या शिक्षणानंतर तिने पुणे गाठले.

तेव्हापासून तिचा नृत्यप्रवास सुरू झाला. रवींद्र पाटील यांची मुलगी गौतमी पाटील असल्याची माहिती श्री. चव्हाण यांनाही नव्हती. मात्र, सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केल्यानंतर त्यांना दीडशेवर फोन आले.

गौतमीची मावशी धुळ्यात येणार असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले. गौतमीशी आमचा काहीही संबंध नाही, अशी माहिती रुग्णालयात उपस्थित नातेवाइकांनी दिली. रवींद्र पाटील यांची प्रकृती गंभीर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : सामनाही गमावला अन् आता BCCIचा कारवाईचा बडगा... हार्दिक पांड्याची दुतर्फा गोची, पुन्हा असं केल्यास बंदी?

स्वरांच्या युगाचा अंत ! आशाताई भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामामात पार पडले अंत्यसंस्कार

ICC चा मोठा धमाका! टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी विक्रमी बक्षीस रकमेची घोषणा; IPL लाही टक्कर देत रकमेत १० पट वाढ

Shahajibapu Patil: तर शिवसेनेचे ५-६ आमदार निवडून येतील: शहाजीबापू पाटील, सोलापूरमध्ये तानाजी सावंत यांना लक्ष घालायला सांगा!

IPL 2026 : टीम डेव्हिडची सर्व 'मस्ती' उतरवली; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अम्पायरने समाजावूनही ऐकला नाही, आता... Video

SCROLL FOR NEXT