Crowd in Agra Road market
Crowd in Agra Road market esakal
उत्तर महाराष्ट्र

Dasara 2022 : बाजारपेठेत चैतन्य; खरेदीसाठी नागरिकांची तुडूंब गर्दी

सकाळ वृत्तसेवा

धुळे : दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (ता. ४) परंपरेनुसार झेंड़ूच्या फुलांची मोठी आवक झाली. तसेच खरेदीसाठी येथील मुख्य आग्रा रोडवरील बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी उसळली. झेंडूची फुले सरासरी ७० ते १०० किलो दराने विक्री होत आहेत. (Dasara 2022 Vitality in market Crowd of citizens for marigold flower shopping dhule latest news)

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत मंगळवारी झेंडूची होत असलेली विक्री.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा अर्थातच विजयादशमी सण आश्‍विन शुद्ध दशमीला म्हणजेच बुधवारी (ता. ५) साजरा केला जाणार आहे. या पूर्वसंध्येला विविध वस्तू, सोने, आभूषणे, वस्त्र खरेदीसाठी शहरातील बाजारपेठ गर्दीने फुलली.

मिठाई, झेंडूची फुले, पूजासाहित्याला मोठी मागणी दिसून आली. शहरातील आग्रा रोड, पारोळा रोड, साक्री रोड, देवपूर परिसरात नागरिकांनी खरेदीसाठी तुडूंब गर्दी केली होती. शिवाय, ऑटोमोबाइल शोरूम व इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्येही ग्राहकांची पावले वळली.

दसऱ्याला केलेली खरेदी लाभदायी मानली जाते. त्यामुळे या दिवशी नवीन वस्तू, वाहने व सोने, तसेच घर, फ्लॅट खरेदीकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे सराफ बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दालनांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली. कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईलची दुकानेही गजबजलेली दिसली.

विविध आकर्षक सवलतीतून ग्राहकांना आकर्षित करण्याचा विक्रेत्यांकडून प्रयत्न झाला. अनेकांनी गृहपयोगी वस्तू, वाहन, घरे यांची नोंदणीही केलेली आहे. यासंदर्भात बुधवारी (ता. ५) शुभमुहूर्तावर व्यवहार पार पाडले जातील. त्यामुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल अपेक्षित असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

Monsoon Update : मॉन्सून अंदमानमध्ये दाखल! ‘एल निनो’ची तीव्रता कमी होत असल्याचे निरीक्षण

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

SCROLL FOR NEXT