The best horses entered in the horse market here. esakal
उत्तर महाराष्ट्र

Sarangkheda Yatra: थंडीत घुमतोय घोड्यांचा टापांचा आवाज; दत्त प्रभूंच्या यात्रोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ

चारशे वर्षाची परंपरा असलेल्या येथील एकमुखी दत्त प्रभूंच्या यात्रोत्सवाला मंगळवारी (ता. २६) श्री दत्तजयंती पासून सुरवात होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Sarangkheda Yatra : चारशे वर्षाची परंपरा असलेल्या येथील एकमुखी दत्त प्रभूंच्या यात्रोत्सवाला मंगळवारी (ता. २६) श्री दत्तजयंती पासून सुरवात होत आहे.

यंदा येथील प्रसिद्ध अश्व बाजार गावालगत असलेल्या जागेवर भरला आहे. अश्व बाजारात दिवसेंदिवस दाखल होणाऱ्या अश्वांची संख्या वाढत आहे.(Datta Prabhu pilgrimage begins from Tuesday nandurbar news)

यातच गुलाबी थंडीत पहाटेच्या सुमारास घोड्यांचा टापांचा आवाज परिसरात निनादू लागला आहे. जातिवंत घोड्यांच्या बाजारासाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या येथील एकमुखी दत्त प्रभुंच्या यात्रोत्सवाला २६ डिसेंबर पासून सुरु होत आहे. तर २१ डिसेंबर पासून चेतक फेस्टिव्हल सुरु झाला आहे.

रविवार (ता.२४) पासून अश्वांच्या विविध स्पर्धांना सुरवात होत आहे. गावालगत असलेल्या चेतक अश्व मैदानावरील ३० एकर क्षेत्रात अश्व बाजार सजविला जात आहे. देशाच्या विविध प्रांतातून दोन दिवसात बाराशेहून अधिक अश्व येथे दाखल झाले आहेत. विविध राज्यांतील उमदे व देखणे घोडे हे यात्रेचे मुख्य आकर्षण असते.

काही वर्षापासून सुरु असलेल्या चेतक फेस्टिव्हलमुळे यात्रेला ग्लोबल स्वरूप आलेले आहे. त्यातून अश्व विक्रेत्यांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. महत्त्वाचे म्हणजे फेस्टिव्हलमुळे हिवाळी पर्यटनस्थळ म्हणून सारंगखेडा पुढे येत आहे. ग्रामीण कला, संस्कृती आणि शेती अर्थव्यवस्थेला चालना देणारा उत्सव म्हणून या यात्रेकडे आता पहिले जात आहे.

फेस्टिव्हल अंतर्गत घोड्यांच्या विविध स्पर्धा व शर्यत घेण्यात येत आहे. स्पर्धा सहभागीसाठी देशातील १४ राज्यातील अश्व स्पर्धकांचा समावेश आहे. तसेच चेतक फेस्टिव्हलच्या माध्यमातून रोज रात्री विविध सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहेत . त्यादृष्टीने देखील त्याची तयारी सुरू आहे.

मैदान होतेय सज्ज...

यात्रा काळात दोन ते अडीच हजार अश्व सारंगखेड्यात येथे असतात. त्यांना राहण्यासाठी व खरेदी, विक्रीसाठी चेतक अश्व मैदानावर ३० एकर क्षेत्रावर मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. तसेच घोडे निरीक्षकांसाठी बॅरिकेट्स, पुरेशी वीज, पाणी, आरोग्य सुविधा, चारा आदी व्यवस्था देखील करण्यात येत आहे.

या बाजारात वाहनांना प्रवेश करता येणार नाही. रोज परिसराची स्वच्छता करण्यात येईल असे नियोजन करण्यात आले आहे. तसेच धुळ उडू नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. यासर्व सुविधांसह घोड्यांच्या रायडिंगसाठी विशेष जागा उपलब्ध करण्यात आली आहे .

अश्व बाजारात रोषणाई

अश्व बाजाराचा लौकिक वाढावा यासाठी चेतक फेस्टिव्हल समितीतर्फे सातत्याने प्रयत्न केला जातो. यावर्षी घोड्यांच्या खरेदी, विक्रीचा व्यवहार रात्रीही करण्यात येणार आहे. त्यासाठी दिव्यांच्या लखलखाटाने यात्रा उजळून निघणार आहे . त्यातच अनेक खरेदीदारांना रात्री पहाटेही घोड्यांची पसंती करून खरेदीचा व्यवहार पूर्ण करता येणार आहे. रोषणाईमुळे घोडे पाहण्यासाठी रात्रीची वेळही अनुकूल ठरणार आहे .

''चेतक फेस्टिव्हलमध्ये येणाऱ्या अश्व शौकीन, व्यापारी, खरेदीदार तसेच यात्रेकरूंना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोणाचीही गैरसोय होणार नाही यासाठी विशेष नियोजन केले जात आहे.''- जयपालसिंह रावल, अध्यक्ष चेतक फेस्टिव्हल समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT