Burzad: Daughter Jayashree Choudhary while cremating her father's remains. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : बुरझड येथे वडिलांना मुलीने दिला अग्निडाग

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : बुरझड (ता. धुळे) येथील प्रगतिशील शेतकरी सुकलाल लुका चौधरी (वय ७०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी साडेसातच्या सुमारास निधन झाल्यानंतर त्यांची एकमेव कन्या जयश्री दिनेश चौधरी हिने शनिवारी (ता. २४) अंत्ययात्रेत वडिलांचा तिरडीला खांदा देत पार्थिवास अग्निडाग दिला.

व प्रथा परंपरेला छेद देत ग्रामीण भागातही बदलाचे वारे वाहत असल्याचे व मुलामुलींमध्ये कोणताही भेद नसल्याचे दाखवून दिले.(Daughter gave fire to her father in Burzad Dhule News)

बुरझड (ता. धुळे) येथील रहिवासी सुकलाल चौधरी यांच्या छातीत दुखत असल्याने मुलगी जयश्री व जावई दिनेश चौधरींना घेऊन एका खासगी रुग्णालयात गेले. मात्र तेथेच त्यांचे निधन झाले. एकुलत्या मुलीसमोरच वडिलांचे अकस्मात निधन झाल्याने आघात कोसळले.

सुकलाल चौधरी यांचे पूर्वीपासूनच्या इच्छेनुसार त्यांच्यावर स्वतःच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी अंत्ययात्रेत जयश्रीने खांदा दिला. तसेच पित्याच्या पार्थिवास अग्निडाग दिला. त्या वेळी अंत्ययात्रेतील उपस्थितांचे डोळे भरून आले होते. त्यांचे भाऊ पांडुरंग चौधरी व पुतणे ईश्वर चौधरी, हिरालाल चौधरी व भय्या चौधरी यांनी खांदा दिला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ईश्वर चौधरी यांनी पाणी दिले. सुकलाल चौधरी यांना मुलगा नसल्याने व मुलीवरील प्रेमात कमतरता भासू नये म्हणून त्यांनी दत्तक न घेता मुलीला मुलासमानच वागणूक देत चांगल्या परिवारात लग्न लावून दिले.

अंत्यसंस्काराचे सोपस्कार करण्याचा अधिकार मुलाला असल्याचे समाजमनात प्रथा रूढ आहे. मात्र बदलत्या काळात मुलगा व मुलगी हे दोघे समान असल्याचे चौधरी परिवाराने दाखवून दिले. सुकलाल चौधरी यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, जावई, भाऊ व तीन पुतणे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री थोडक्यात बचावले, उड्डाण घेताच मागे जाऊ लागलं हेलिकॉप्टर, मोठी दुर्घटना टळली!

IND vs AUS, 1st T20I: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची दणक्यात सुरुवात; पावसाने खोडा घातला, पण सिडनीत विजय मिळवला

Pune: महाशिवरात्री उत्साहाला गालबोट! हरिश्चंद्र गडावर दुर्दैवी घटना, दर्शनाहून परतताना भाविकावर काळाचा घाला

T20 WC, IND vs PAK: अभिषेक शर्माचं कमबॅक होणार, कुलदीप यादवही खेळणार! भारताची पाकिस्तानविरुद्ध कशी असेल प्लेइंग इलेव्हन?

Shashikant Shinde: विलीनीकरण चर्चेस आता पूर्णविराम, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT