daughters done last rituals of after father death nandurbar news esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : चालीरीतींना फाटा देत मुलींनी दिला पित्याला मुखाग्नी!

सकाळ वृत्तसेवा

वडाळी (जि. नंदुरबार) : सर्वसामान्यपणे हिंदू धर्म पद्धतीत पित्याच्या चितेला फक्त मुलगा अग्नी देतो किंवा देऊ शकतो.

स्त्री-पुरुष भेदभावाच्या ज्या अनेक चालीरीती हिंदू धर्मात अस्तित्वात आहेत, त्यातलीच हीसुद्धा एक. (daughters done last rituals of after father death nandurbar news)

पण बोराळे (ता. शहादा) येथील संभाजी मोतीलाल पवार यांच्या तीन मुली मनीषा अजय पाटील, भारती संतोष पाटील व भार्गवी ललित पाटील यांनी कोणत्याही दांभिक चालीरीतींची भिडभाड न बाळगता पित्याच्या चितेला स्वत:च अग्नी दिला. त्यांच्या हिमतीला दाद देत आसपासच्या लोकांनीदेखील कौतुक केले व या भूमिकेला पाठिंबा दिला.

बोराळे येथील प्रगतिशील शेतकरी संभाजी पवार (वय ७३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना त्यांच्या मुलींनी खांदा देत अखेरचा निरोप दिला. पवार यांच्या पश्चात मुलगा नसल्याने तिन्ही मुलींनी मुखाग्नी दिला. ग्रामस्थांसह समाजाने घेतलेल्या सामंजस्याच्या आणि पुरोगामी भूमिकेमुळे इतरांपुढे वेगळा आदर्शच घातला गेला आहे.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

या वेळी नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष डॉ. सयाजी मोरे, बोराळे सरपंच अविनाश भिल, माजी उपसरपंच दीपक बागल, पंडितराव पाटील, कोंढावळचे पोलिसपाटील सुरेश गोसावी, हर्षवर्धन बागल, नंदलाल बागल आदींसह बोराळे परिसरातील नागरिक, समाजबांधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ठाकरेंचं चॅलेंज फडणवीसांनी स्वीकारलं; म्हणाले, एक लाख रुपये जिंकलो!

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! पुणे, दौड, काष्टी रुळाचे काम होणार; नागपूर-पुणे मार्गावरील गाड्या झाल्या रद्द..

Nashik Grapes Export : नाशिकच्या द्राक्षांचा परदेशात डंका! नेदरलँड अन् जर्मनीसाठी पहिली ३० टनांची खेप रवाना

Chhatrapati Sambhajinagar News : शहर पर्यटन वाढीला आडकाठी! नियोजित पर्यटन धोरण वर्षभरापासून रखडले

Bigg Boss Marathi 6 Video : "तुझं तोंड शेणात घाल"; पहिल्याच दिवशी रुचिता-तन्वीमध्ये जुंपली !

SCROLL FOR NEXT