Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धुळ्यातील मारहाणीत जखमीचा मृत्यू ; शहर पोलिस ठाण्यात नोंद

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : आईच्या उत्तर कार्यासाठी आलेल्या खर्चावरून वाद घालून एकास जबर मारहाण करण्यात आली. त्यात तो जखमी झाला. त्यास उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

या घटनेत ज्ञानेश्वर नामदेव शिंदे (वय ४५, रा. नथ्थूबाबा नगर, मोहाडी उपनगर, धुळे) यांना जीव गमवावा लागला. या घटनेच्या अनुषंगाने त्यांची पत्नी आशाबाई शिंदे यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार धुळे शहर पोलिस ठाण्यात प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. (Death of injured in beating in Dhule Reported at city police station Dhule Crime News)

पीडित आशाबाई ज्ञानेश्वर शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सहा जूनला त्या सासू केसरबाई नामदेव शिंदे यांच्या उत्तर कार्यासाठी पती ज्ञानेश्वर नामदेव शिंदे यांच्यासोबत मोहाडी उपनगरात गेल्या.

या ठिकाणी त्यांचे पुतणे, जेठानी, भाचे, भाची व नणंद आदींनी उत्तर कार्याच्या खर्चावरून ज्ञानेश्वर शिंदे यांच्याशी वाद घातला.

हा वाद सतत तीन दिवस चालत राहिल्यानंतर १६ जूनला सायंकाळी सहाला भाचा मनोज सोनवणे, सागर सोनवणे, जेठानी रंजना शिंदे, पुतणे चेतन शिंदे, मयूर शिंदे, सचिन शिंदे, नणंद सकुबाई, छोटी, विमल, भाच्या राणी व सोनी, पाहुणे जगू सोनवणे, पुतणी, कामिनी आदींनी एकत्र येत ज्ञानेश्वर शिंदे व आशाबाई शिंदे यांना शिवीगाळ केली. हा वाद विकोपास गेला व या दोघांनाही मारहाण करण्यात आली.

मनोज सोनवणे याने त्याच्या हातातील काठीने ज्ञानेश्वर शिंदे यांच्या पाठीत मारहाण केली. पुतणी कामिनी हिने वीट मारून फेकली. या हाणामारीत ज्ञानेश्वर हे जखमी झाले. त्याचवेळी घटनास्थळी पोलिसांना बोलविण्यात आले.

पोलिसांनी वाहनात बसवून त्यांना नेण्याचा प्रयत्न केला असता अग्रसेन पुतळ्याजवळ ज्ञानेश्वर शिंदे यांच्या छातीत वेदना सुरू झाल्या.

त्यामुळे त्यांना जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने रुग्णवाहिकेतून त्यांना नवीन जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणीअंती ज्ञानेश्वर शिंदे यांना मृत घोषित केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Full Speech : मराठी, मुंबई, महाराष्ट्र अन् बाळासाहेब ठाकरेंचा किस्सा : राज ठाकरेंचं 25 मिनिटांचं प्रचंड आक्रमक भाषण

Raj Thackeray : ''ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडियम शिकतात'' म्हणणाऱ्या फडणवीसांना राज ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले, ''मी हिब्रूत शिकेन पण...''

Latest Maharashtra News Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

SCROLL FOR NEXT