crime
crime 
उत्तर महाराष्ट्र

धुळे: साडेआठ लाखाचा सिनेस्टाईल धाडसी दरोडा

भगवान जगदाळे

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील ऐचाळे (ता.साक्री) शिवारात १४ जुलै रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास सुरत (गुजरात) येथील भंगारच्या व्यापाऱ्यांना जामदे (ता.साक्री) येथील २५ ते ३० संशयितांनी तलवार, कोयता, लोखंडी सळई, लाठ्याकाठ्यांनी मारहाण करत सुमारे साडेआठ लाखांची सिनेस्टाईल धाडसी लूटमार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मोहम्मद उमर मोहम्मद जुबेर पिला (रा.सुरत, वय-३२, धंदा-भंगार व्यापार) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जामदे येथील २५ ते ३० संशयितांविरुद्ध १७ जुलै रोजी नंदुरबार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. सदर गुन्ह्याचे ठिकाण हे निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने संबंधित गुन्हा शून्य क्रमांकाने (ता.२१) निजामपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

घटनेची थोडक्यात पार्श्वभूमी अशी: फिर्यादी मोहम्मद उमर यांचा सुरत (गुजरात) येथे भागीदारीने सुरू केलेला अर्श एन्टरप्रायजेस नावाने भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यात मोहम्मद उमर यांच्यासह शेख आरिफ सौदागरभाई, मोहम्मद शोएब मोहम्मद, इसाक मेवेवाला व इरफान इकबाल सोनी आदींचा समावेश आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी रांदेर, सुरत येथील भंगाराचे दलाल इम्रान भाई व मोहम्मद भाई यांच्या संपर्कातील जामदे (ता.साक्री) येथील राजू बिहारी (पूर्ण नाव माहीत नाही) हा फिर्यादीच्या दुकानावर गेला. तेथे आम्हाला छडवेल-कोर्डे येथील सुझलॉन कंपनीतील भंगार माल विक्री करायचा आहे असे सांगून १५-२० मिनिटांनंतर तो तेथून निघून गेला. महिन्याभरानंतर त्याने इरफान व शोएब यांना फोन करून साक्री येथे मिटिंगसाठी बोलावले. तेथे बसस्थानकाजवळील एका चहाच्या हॉटेलमध्ये चर्चा केली. तुमच्या दुकानाचे टेंडर तयार झाले असून लवकरच माल घेणेबाबत कळवतो असे सांगितले. 

त्यानंतर ११ जुलै रोजी त्याने मोबाईलद्वारे 'टेंडर मंजूर झाले असून पैसे घेऊन या व माल घेऊन जा' असे कळविले. त्यानुसार १४ जुलै रोजी भागीदारांसह पैसे घेऊन येतो असे फिर्यादीने त्याला कळविले. ठरल्यानुसार १४ तारखेला सकाळी १० वाजता काका आयुबभाई गुलामरसुल रोटीवाला व भागीदारांसह फिर्यादी कारने घटनास्थळी येण्यासाठी निघाले. नवापूरपर्यंत आल्यावर राजू बिहारीने त्यांना फोन करून नंदुरबारला पोहचल्यावर फोन करा असे सांगितले. व नंदुरबारला पोहचल्यानंतर पुन्हा फोन करून शनिमांडळला या व मंदिराजवळ थांबा असे सांगितले. व्यापारी शनिमांडळला पोहचल्यानंतर त्याने तिथे मोटारसायकलीने त्याच्या एका माणसाला पाठविले. मोटारसायकलीच्या पाठीमागे व्यापारी कारने शनिमांडळपासून ५ ते ६ किलोमीटर पुढे गेले. ऐचाळे पासून एक ते दिड किलोमीटर अंतरावर एका टॉवरजवळ त्यांना थांबवून आम्ही माल घेऊन येतो असे संबंधित इसमाने सांगितले.

त्यानंतर साधारण दहा मिनिटांनी म्हणजे सायंकाळी साडेसातला राजू बिहारी मोटारसायकलींनी २५ ते ३० जणांसह लोखंडी सळया, लाठ्याकाठ्या, तलवारी व कोयते सोबत घेऊन तेथे आला. तेथे आल्याबरोबर त्यांनी फिर्यादीसह कारमध्ये बसलेल्या त्याच्या साथीदारांना मारहाण करण्यास सुरुवात केली. कारमधील कापडी पिशवीतील रोख साडेसात लाख रुपयांसह सुमारे साडेआठ लाखांचा ऐवज त्यांनी लुटून नेला. फिर्यादीचे काका आयुबभाई वगळता सर्वांकडील मोबाईल व रोकडही त्यांनी मारहाण करून हिसकावून नेली. त्यानंतर जीवाच्या आकांताने सर्व पीडितांनी तेथून पळ काढला व रात्रभर एका शेतातच थांबले. 

दुसऱ्या दिवशी (ता.१५) सकाळी शनिमांडळ फाट्यापासून ट्रकने पीडित नंदुरबारच्या अव्वलगाजी दर्ग्याजवळ जाऊन पोहचले. तेथे सामाजिक कार्यकर्ते आरिफ कमर शेख यांना भेटून आपबीती सांगितली. तेथून इतर तिन्ही साथीदारांसह थेट नंदुरबार पोलीस स्टेशन गाठले. आरोपींच्या आपापसांतील बोलण्यावरून राजू बिहारीसह बबन, बच्चन, निर्मल, सोन्या, कल्पेश, शनी पवार अशी त्यांची नावे आहेत. अंधार असल्याने आरोपींचे चेहरेही व्यवस्थित दिसले नाहीत म्हणून फिर्यादीला त्यांचे वर्णनही करता आले नाही.

मुद्देमालात कापडी पिशवीतील शोएबकडील रोख तीन लाख, मोहम्मद उमरकडील दोन लाख, आयुबभाईंकडील अडीच लाख रुपये व नूरमोहम्मद यांचे खिशातील चाळीस हजार, आयुबभाई रोटीवाला यांचे खिशातील चौदा हजार, शोएब मेवेवाला यांच्या खिशातील सोळा हजार, मोहम्मद उमर यांचे खिशातील दहा हजार व इरफान सोनी यांच्या खिशातील रोख सहा हजार अशा एकूण ८ लाख ३६ हजार रुपयांचा समावेश आहे. फिर्यादीचे काका आयुबभाई मारहाणीमुळे घाबरल्याने त्यांच्यावर दोन दिवस सुरतला खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. 

त्यानंतर फिर्यादीने १७ जुलैला नातेवाईकांसह नंदुरबार पोलीस स्टेशन गाठून राजू बिहारीसह अन्य २५ ते ३० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनास्थळ निजामपूर पोलीसांच्या हद्दीत येत असल्याने शून्य क्रमांकाने गुन्हा निजामपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील व हवालदार राजाराम बहिरम घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Latest Marathi News Live Update : '400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही'; अमित शहांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT