Approval  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : जमिनीच्या छोट्या तुकड्यांच्या व्यवहाराची दस्त नोंदणी होणार

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : तुकडेबंदी कायदा अस्तित्वात असूनही जमिनींचे तुकडे पाडून दस्त नोंदणी करण्यात येत होती. याबाबत अनेक गैरप्रकार समोर आल्यानंतर अशा प्रकारच्या जमिनींची खरेदी-विक्री करायची असल्यास संबंधित क्षेत्राचे रेखांकन (ले-आउट) करून जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेणे बंधनकारक करण्याबाबतचे परिपत्रक नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने काढले होते.

औरंगाबाद खंडपीठाने हे परिपत्रक रद्द केल्याने जमिनींच्या छोट्या तुकड्यांच्या व्यवहारांची पुन्हा दस्तनोंदणी होणार आहे. (Deed of transaction of small pieces of land will registered Dhule News)

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या परिपत्रकाला औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली होती. मात्र, त्यावर राज्य शासनाने पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणीअंती खंडपीठाने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे १२ जुलै २०२१ चे परिपत्रक रद्द केले.

नोंदणी कायद्यामध्ये बदल होत नाही तोपर्यंत कोणतेही दस्त नाकारता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने तुकडेबंदी तुकडेजोड सुधारणा अधिनियमाच्या कलम-ब नुसार परिपत्रक प्रसृत केले होते.

त्यानुसार एक-दोन-तीन गुंठे जागांचे व्यवहार करताना संबंधित क्षेत्राचे रेखांकन (ले-आउट) करून जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतल्यास दस्तनोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले होते.

याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली होती. त्यावर खंडपीठाने निकाल देऊन हे परिपत्रक व महाराष्ट्र नोंदणी नियम १९६१ चे नियम क्रमांक ४४ (१) (आय) रद्द केले होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

या निकालाविरोधात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने यापूर्वीचा निकाल कायम ठेवला. या निकालामुळे राज्य सरकारपुढे अनेक तांत्रिक व कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

या निर्णयाने दस्तनोंदणीवरील बंदी उठली असली, दहा गुंठ्यांच्या आतील व्यवहारांची सातबारा उताऱ्यावर नोंद न घेणे किंवा महारेराकडे नोंदणी न करता बांधकाम होऊ न देणे यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा प्रशासनावर येऊन पडली आहे.

जमिनींचे बेकायदा तुकडे पाडणे, अनधिकृत इमारतीची सदनिकांची खरेदी-विक्री यांच्या दस्तनोंदणीवर असलेली बंदी उठल्याने काही प्रमाणात मात्र दिलासा असला तरी त्यातून नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Barshi Crime : बार्शीत एसटी महामंडळ बसच्या महिला वाहकास मारहाण; सहा महिलांविरुद्ध गुन्हा

Akola News : खदान पोलीस स्टेशनमधील नितीन मगर निलंबीत, डीबी स्कॉडवर पुन्हा संशयाची सावली

Latest Marathi News Live Update: वृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावणारा सराईत चोरटा गजाआड

SCROLL FOR NEXT