Citizens of the demarcation area protesting in the Municipal Corporation for the cancellation of the increased property tax bills esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : सोयी-सुविधांची बोंब; करआकारणी बेकायदा; बिले रद्द करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

धुळे : महापालिकेमार्फत आम्हाला कोणत्याही सोयी-सुविधा नसताना वाढीव करआकारणी झाली आहे. त्यामुळे बेकायदा बिले तत्काळ रद्द करण्यात यावीत, आम्हाला पूर्वीच्याच दराने मालमत्ता कराची बिले द्यावीत, अशी मागणी हद्दवाढ क्षेत्रातील नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे केली. (Demand cancellation of property owners bills in demarcation areas Demonstrations in Municipal Corporation dhule news)

महापालिकेच्या हद्दवाढ क्षेत्रातील मालमत्ताधारकांना महापालिकेकडून सुधारित करआकारणी प्रक्रियेनंतर मालमत्ता कराची बिले वितरित करण्यात आली आहेत. मात्र, ही करआकारणी बेकायदा असल्याचा आरोप हद्दवाढ क्षेत्रातील मालमत्ताधारकांनी केला आहे.

महापालिकेने गेल्या वर्षी ४ ऑक्टोबरला कर मूल्य निश्चित केल्याबाबत विशेष नोटीस बजावली होती. मात्र निश्चित केलेल्या करांपेक्षा अधिक कराची आकारणी करण्यात आली असून, २१ डिसेंबरला प्राप्त बिलांमध्ये कर दुप्पट करण्यात आला आहे. महापालिकेच्या करवाढीच्या निर्णयाला यापूर्वीच लेखी हरकत नोंदविली होती.

मात्र महापालिका प्रशासनाने हरकती विचारात घेतल्या नाहीत. मालमत्तांचे मोजमाप केल्यानंतर त्याचा तपशील देणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप तसा तपशील देण्यात आलेला नाही. मालमत्तेची नोंदणी मान्य किंवा अमान्य असल्याबाबत नागरिकांना विचारणा करण्यात आलेली नाही.

सुविधा नसताना कर कसा?

महापालिकेतर्फे हद्दवाढ क्षेत्रात रस्ते, गटारांची सुविधा नसतानाही त्याबाबत कर आकारला जात आहे. आमच्या परिसरात महापालिकेने मलनिस्सारणबाबतही कोणतीही सुविधा पुरविलेली नाही तरीही मलनिस्सारण कर आकारण्यात आले आहे. स्वच्छता होत नसताना विशेष स्वच्छता कर, शिक्षणाची विशेष सुविधा नसताना शिक्षण कर आकारला आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

कोणत्याही प्रकारे आरोग्य सुविधा नाहीत, वृक्षलागवड नाही, बगिचे नाहीत, मोकळ्या जागांना संरक्षक भिंत नाही. असे असताना महापालिकेकडून विविध करांची आकारणी केल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

त्यामुळे सोयी-सुविधा पुरवत नसताना मालमत्ता करआकारणीची बेकायदा बिले तत्काळ रद्द करावीत, पूर्वीच्या दराप्रमाणे बिले द्यावीत, अशी मागणी हद्दवाढ क्षेत्रातील मालमत्ताधारकांनी केली. मागणीचे निवेदन अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस यांना दिले. तसेच मागणीसाठी महापालिकेत निदर्शनेही केली.

आबा पाटील, अशोक गिरी, अरुण धुमाळ, मुकेश खरात, जगदीश चव्हाण, छोटू चौधरी, स्वप्नील भामरे, प्रवीण साळवे, किशोर पाटील, विजय सिसोदिया, बी. बी. मासूळ, रणजित भोसले, विजय रायते, एन. एल. पाटील, मयूर देवरे, वाल्मीक वाघ, जितेंद्र पाटील, महेंद्र शिरसाट, प्रवीण पाटील, शशी पाटील, संदीप पाकळे, संजय माळी, ललित देवरे, अनिल चित्ते, योगेश वसावे, हेमंत पाठक, जितेंद्र काकडे, वाल्मीक पाटील, बी. डी. पाटील, अमोल पवार, विकी देवरे, लोटन वाघ आदींनी हे निवेदन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT