Dengue Infection esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Dengue News : नंदुरबारमध्ये डेंगी, चिकूनगुनियाचा डंख; अवकाळीचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Dengue News : बदलते हवामान व अवकाळी पाऊस यामुळे डासोत्पत्तीस्थानात वाढ होऊन डेंगी व चिकूनगुनिया या आजारांचा प्रसार होत असून, नागरिकांनी साठविलेल्या पाण्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास डेंगी व चिकूनगुनियाला प्रतिबंध करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील यांनी केले.(Dengue and chikungunya cases increase in Nandurbar due to unseasonal rain nandurbar news)

डेंगी व चिकूनगुनियाचा प्रसार एडिस इजिप्ती डासांच्या चावण्यापासून होतो. या डासांची उत्पत्ती साठवणूक केलेल्या स्वच्छ पाण्यात होते. नागरिकांनी आपल्या घरातील पाणी साठवणुकीचे भांडे आठवड्यातून एकदा रिकामे व कोरडे करून भरावे. एक दिवस कोरडा पाळण्यात यावा. आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी.

आजाराची लक्षणे

तीव्र डोकेदुखी, डोळ्यांच्या खोबणीत वेदना, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, भूक मंदावणे, उलट्या होणे, प्रसंगी उलट्यांतून रक्त येणे, तोंडाला कोरड पडणे, रक्तमिश्रित काळसर शौचास होणे ही डेंगी तापाची लक्षणे आहेत.

डेंगीबाबत लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या जिल्हा सामान्य रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन मोफत रक्ततपासणी करावी आणि औषधोपचार घ्यावेत. खासगी लॅबधारकांनी डेंगी रुग्णांचे नमुने जिल्हा रुग्णालयात पाठविण्याची कार्यवाही करावी.

डेंगी आजाराच्या निश्चित निदानासाठी इलायझा टेस्ट ही परिपूर्ण चाचणी आहे. ही चाचणी जिल्ह्यामध्ये शासकीय जिल्हा रुग्णालयातील सेन्टीनल सेंटर येथे मोफत करण्यात येत असल्याचेही श्रीमती पाटील यांनी सांगितले.

उपाययोजना

डेंगी व चिकूनगुनिया डासांची उत्पत्ती साठलेल्या पाण्यात होत असल्याने पाणी व्यवस्थापन योग्य रीतीने केल्यास डासांची निर्मिती व पर्यायाने हिवताप, डेंगीचे प्रमाण शहरात व आपल्या गावात निश्चित कमी होईल. यासाठी घराजवळ असलेली नाली वाहती करून डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात यावीत.

नष्ट करता न येणाऱ्या मोठ्या डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडण्यात यावेत. पाण्याच्या साठ्यांना घट्ट झाकण बसवावे. घरातील कूलर, फ्रीजचा ड्रिप पॅन नियमित स्वच्छ करावा. गटारी वाहती करावीत आणि छोटे खड्डे व डबकी बुजवावीत.

इमारतीच्या छतावर पाणी साचू देऊ नये, परिसरातील टायर, बाटल्या इत्यादी भंगार सामानाची विल्हेवाट लावावी. गुरांची/पक्ष्यांची पाण्याची भांडी नियमित स्वच्छ करावीत. अंगभर कपडे घालावेत. झोपताना मच्छरदाणीचा, डासप्रतिबंधक साधनांचा वापर करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाटातल्या गूढ अपघाताचा उलगडा… कोकणातून हॉटेल चालकाचा फोन ठरला टर्निंग पाईंट! नाहीतर...

Kolkata Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने कोलकाता हादरले; लोक घाबरून घरं सोडून पळाले; बांगलादेशातही बसले हादरे

Mithun Career Rashifal 2026: शनि घेणार तुमची परीक्षा, पण गुरु असेल तुमच्या बाजूने, जाणून घ्या मिथुन राशीचे वार्षिक आर्थिक राशिफल

Latest Marathi News Live Update : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी आज उमेदवारांना माघारीची अखेरची मुदत

Ashes 2025 England vs Australia : खरोखरची राख असलेली 'अ‍ॅशेस ट्रॉफी' आता कुठं आहे? त्यात नेमकी कशाची राख आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT