उत्तर महाराष्ट्र

झोपडपट्टी ते जर्मनी... धरणगावच्या लक्ष्मणची भरारी

सकाळ वृत्तसेवा

धरणगावः येथील हनुमाननगर झोपडपट्टीत राहणारा शेतकरी पुत्राने शिक्षणाचा बळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जर्मनीची भरारी घेतली आहे. त्याच्या या परदेशवारीचा आनंदोत्सव हनुमान नगर झोपडपट्टीने साजरा केला. 

येथील शेतकरी खंडू महाजन यांचा सुपुत्र लक्ष्मण बाविस्कर (महाजन) याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पी. आर. हायस्कूलमध्ये दहावीचे शिक्षण घेतले. आपला मुलगा शिकून साहेब व्हावा अशी त्याची आई शोभाबाईची इच्छा होती. शेतमजुरी व लाकडाचा व्यवसाय करीत त्याच्या वडिलांनी मुलगा लक्ष्मणची शिक्षणाची जिद्द पाहता त्याला बी. ई. (मॕकॕनिकल) चे शिक्षण पूर्ण केले. त्याला एक वर्षापूर्वी पुणे येथील मॕन ट्रक अॕण्ड बस इंडिया प्रा. लि. या कंपनीत असिस्टंट मॅनेजर या पदावार नोकरी मिळाली. त्यामुळे परिवाराला लक्ष्मणचा आधार मिळाला. लक्ष्मणने कंपनीत आपल्या कामाची चमक दाखविल्याने कंपनीने त्याची मुनीच, जर्मनी येथे ‘पीएलएम' सिस्टीम प्रकल्प ट्रेनिंगसाठी निवड केली असून २६ जानेवारीला तो जर्मनीसाठी रवाना झाला आहे. या निवडीमुळे हनुमान नगर रहिवाशांनी आनंद साजरा केला. त्‍याच्‍या या निवडीबद्दल सामाजिक कार्यकर्ते दिनेश लोहार, ईश्वरलाल बन्सी, मोहन पित्रोडा, रामकृष्ण पाटील, छगन पित्रोडा, शफी शाह, बाबू पटेल, शब्बीर बोहरी आदींनी सत्‍कार केला. 

आई- वडिलांच्या परिस्थितीची मला जाणीव असल्याने मी अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करून इथपर्यंत पोहचलो. परिस्थितीचे रडगाणे न गाता गरीब विद्यार्थ्यांनी त्यावर मात करण्याची जिद्द ठेवली तर यश मिळते हा माझा अनुभव आहे. 
- लक्ष्मण बाविस्कर, धरणगाव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT