11th admissions process esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule 11th Admission : अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरू; 8 जुलैला शिल्लक जागांसाठी नियोजन

सकाळ वृत्तसेवा

Dhule 11th Admission : यंदाच्या शैक्षणिक वर्षांतर्गत जाहीर वेळापत्रकानुसार अकरावीची प्रवेशप्रक्रिया बुधवार (ता. १४)पासून सुरू झाली आहे. ती ८ जुलैला संपविण्याची सूचना शासनाने दिली आहे. (Dhule 11th Admission process has started news)

अकरावीसाठी प्रवेशकर्त्या विद्यार्थ्याला १७ जूनपर्यंत अर्ज सादर करावे लागतील. अर्जांची २० जूनला दुपारी चारपर्यंत छाननी, संवर्गनिहाय प्राप्त अर्जानुसार विद्यार्थ्यांची यादी तयार करणे, २१ ला दुपारी चारपर्यंत पहिली संवर्गनिहाय गुणवत्तायादी व प्रतीक्षायादी तयार करून ती प्रकाशित करणे, २४ जूनला पहिल्या गुणवत्तायादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे,

२६ ला रिक्त जागी दुसऱ्या प्रतीक्षायादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशयादी जाहीर करणे, २७ ला रिक्त जागी दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे, २८ जूनला दुपारी चारपर्यंत रिक्त जागी तिसऱ्या प्रतीक्षायादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशयादी जाहीर करणे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

३० ला रिक्त जागी तिसऱ्या प्रतीक्षायादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे, १ जुलैला दुपारी चारपर्यंत रिक्त जागी चौथ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशयादी जाहीर करणे.

३ जुलैला रिक्त जागी चौथ्या प्रवेशयादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे, तसेच प्रतीक्षायादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊनही शिल्लक राहिलेल्या जागा प्राप्त प्रवेश अर्जानुसार गुणानुक्रमे भरणे, ३ जुलैलाच दुपारी बारापर्यंत शिक्षण उपसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्रवेशासाठी प्राप्त अर्जांची यादी व संवर्गनिहाय यादी प्रवेश दिलेल्या तारखेसह सादर करणे, ८ जुलैला प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या जागांवर प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT