RTE admission sakal
उत्तर महाराष्ट्र

RTE Admission : ‘आरटीई’ प्रवेशासाठी 1400 विद्यार्थ्यांची निवड! धुळे, नंदुरबार जिल्ह्याची स्थिती

Dhule News : खासगी शाळांमध्ये वंचित घटक, सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शिक्षणहक्क कायदा अर्थात आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची ठप्प प्रक्रिया अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा सुरू झाली आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली असून, सोमवारी (ता. २२) पाल्यांच्या प्रवेशासाठी लघुसंदेश पाठविण्यात येणार आहेत.

धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील एकूण १५९ शाळांमधील एक हजार ५५६ रिक्त जागांसाठी एकूण तीन हजार ७२९ अर्ज दाखल झाले. त्यातील एक हजार ४०० विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला असून, त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. (dhule 1400 students selected for RTE admission Status of Nandurbar District marathi news)

खासगी शाळांमध्ये वंचित घटक, सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. यंदा शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशांच्या नियमांत बदल केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. परिणामी न्यायालयात याचिका दाखल होऊन प्रवेशप्रक्रिया ठप्प झाली.

त्यामुळे जुलै अर्धा होऊनही प्रवेशप्रक्रिया सुरू झाली नाही. त्यामुळे पालक, विद्यार्थी आरटीईच्या प्रवेशप्रक्रियेकडे डोळे लावून होते. मात्र, शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशात केलेले बदल घटनाबाह्य असल्याचा निकाल न्यायालयाने १९ जुलैला दिला. त्यामुळे आता खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला.

धुळे जिल्ह्यात १०५ शाळांमध्ये आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश निश्चित झाला आहे. त्यानुसार एक हजार १३७ जागा आरक्षित आहेत. यासाठी जिल्ह्यातून एकूण दोन हजार ८४९ अर्ज दाखल झाले. त्यातील एक हजार १०२ विद्यार्थ्यांना प्रवेश घोषित झाला आहे, तर नंदुरबार जिल्ह्यातील ५४ शाळांत ४१९ जागा राखीव आहेत. (latest marathi news)

त्यासाठी जिल्ह्यातून ८८० अर्ज दाखल झाले. त्यातील २९८ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. मात्र, आरक्षित जागांपैकी धुळे ३५ तसेच नंदुरबार जिल्ह्यात १२१ जागा रिक्त असल्याची आकडेवारी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर दिसते.

२३ पासून प्रवेशनिश्‍चिती

पडताळणी समितीमार्फत पाल्यांचा प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाइन सोडतीद्वारे निवड झालेल्या निवड यादीतील पाल्यांच्या पालकांना प्रवेशासाठी जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावरील पडताळणी केंद्राची संबंधित अधिकारी यांनी तपासणी करून पडताळणी केंद्रे अद्ययावत करण्यात यावीत.

तसेच पालकांनी केवळ ‘एसएमएस’वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती वा टॅबवर आपल्या पाल्याचा अर्ज कमांक टाकून पडताळावा. तसेच वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालकांनी अवलोकन करावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. लघुसंदेश मिळालेल्या पालकांना २३ ते ३१ जुलै या कालावधीत जिल्ह्यातील संबंधित तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्र पडताळणी करून पाल्याचा प्रवेश निश्चित करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Raju Shetti:'अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही': माजी खासदार राजू शेट्टी; शेतकऱ्यांवर गंभीर संकट, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

SCROLL FOR NEXT